IPL मुळे इंग्लंडला मोठा फटका; अ‍ॅशेसमधूनही जोफ्रा आर्चर बाहेर

IPL मुळे इंग्लंडला मोठा फटका; अ‍ॅशेसमधूनही जोफ्रा आर्चर बाहेर

नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे मुंबई इंडियन्सला समस्यांचा सामना करावा लागत असतानाच आता इंग्डंल संघालाही मोठा फटका बसणार आहे. जोफ्रा आर्चरची दुखापती गंभीर असल्यामुळे तो आगामी ऍशेस मालिकेतून (ashes 2023) बाहेर पडला आहे. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत  माहिती दिली आहे.

जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे गेल्या वर्षी आयपीएलमध्ये भाग घेतला नव्हता. तो मोठ्या कालवधीनंतर आयपीएलच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आणि पुनरागमनासाठी प्रयत्न करताना दिसला. पण सुरुवातीचे सामने खेळल्यानंतर तो फीट नसल्यामुळे काही सामन्यात खेळताना दिसला नाही आणि त्यानंतर असे समोर आले की, त्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे माघारी परतला आहे. परंतु आता असे समजते की, जोफ्रा आर्चरची दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुढील काही दिवस पुन्हा एकदा क्रिकेटपासून लांब राहणार आहे.

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉब यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, जोफ्रा आर्चरच्या पुनरागमानासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. जोफ्रा पुन्हा एकदा इंग्लंडच्या जर्सीत मैदानात उतरेल असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

जोफ्रा आर्चर दोन वर्षांपासून कसोटी खेळलेला नाही
जोफ्रा आर्चरला मागील दोन वर्षांपासून स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याने मार्च 2021 पासून इंग्लंडसाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आर्चरला दुखापतीमुळे इंग्लंड आणि ससेक्स टीमच्या मेडिकल स्टाफच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आले होते. यावर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी जोफ्रा आर्चर संघात पुनरागमन करेल, अशी इंग्लंडची आशा आहे. त्यानुसार आर्चरने डिसेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. पण त्याला पुन्हा एकदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याने आयपीएलही अर्ध्यावर सोडली आहे.

First Published on: May 16, 2023 7:02 PM
Exit mobile version