इंग्लंडचा तब्बल ६-१ ने पनामावर धमाकेदार विजय

इंग्लंडचा तब्बल ६-१ ने पनामावर धमाकेदार विजय

इंग्लंडचा पनामावर विजय

फिफा विश्वचषकाच्या जी ग्रुपमधील इंग्लंडविरूद्ध पनामा या सामन्यात इंग्लंडने तब्बल ६ गोल मारत पनामावर अप्रतिम विजय मिळवला आहे. पहिला सामना ट्युनिशियासोबत २-१ ने जिंकल्यावर आता सलग दुसरा सामना जिंकत थेट बाद फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार हॅरी केन आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने या सामन्यात हॅट्रीक नोंदविली.

इंग्लंड संघांच कर्णधार हॅरी केन

सामन्याच्या सुरूवातीपासूनच इंग्लंडचे सामन्यावर वर्चस्व दिसून येत होते. सामन्याच्या सुरूवातीच्याच ८ व्या मिनिटाला स्टोन्सकडून गोल करण्यात आला आणि सामन्यात इंग्लंडने आपले खाते खोलले. २२ व्या मिनिटाला पनामाच्या चूकीमुळे इंग्लंडला पेनल्टी मिळाली आणि तिचा पूर्ण उपयोग करत संघांचा कर्णधार हॅरी केनने गोल केला. यानंतर लिंगार्डने ३६ व्या मिनिटाला गोल केला आणि इंग्लंडला ३-० ची आघाडी मिळवून दिली. लगेचच ४० व्या मिनिटाला स्टोन्सने स्वत:चा दुसरा तर संघाचा चौथा गोल केला. यानंतर हाफ टाईमसाठी मिळालेल्या अतिरीक्त वेळेत पुन्हा पेनल्टी किकचा फायदा उचलत हॅरी केनने स्वत:चा दुसरा तर संघाचा पाचवा गोल करत हाफ टाईमपूर्वी ५-० असा स्कोर स्कोरबोर्डवर लावला.
हाफ टाईमनंतर कर्णधार हॅरी केनने ६२ व्या मिनिटाला सामन्यात स्वत:चा तिसरा गोल करत हॅट्रीक नोंदविली. तर ७८ व्या मिनिटाला पनामाच्या बॅलोयने एक गोल केला. मात्र वेळे अखेरीस ६-१ च्या फरकाने इंग्लंडने सामन्यात विजय मिळवला.

या पराभवासोबतच सलग दुसऱ्यांदा विश्वचषकात सामना हरल्याने पनामाचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे.

पनामाचा संघ
First Published on: June 24, 2018 7:53 PM
Exit mobile version