Vinod Kambli Arrested : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक अन् जामीन, नेमकं प्रकरण काय?

Vinod Kambli Arrested : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक अन् जामीन, नेमकं प्रकरण काय?

Vinod Kambli Arrested: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक अन् जामीन, नेमकं प्रकरण काय आहे?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात मद्यधुंद अवस्थेत विनोद कांबळी याने एका कारला जोरदार धडक दिली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र नंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय विनोद कांबळी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने कारला धडक दिल्याचा आरोप करत एका व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळीला अटक केली होती. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विनोद कांबळी यांनी त्याची कार सोसायटीच्या गेटवर धडकली होती.

विनोद कांबळीने भारतासाठी 107 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32 च्या सरासरी 2477 धावा केल्या होत्या. विनोद कांबळीच्या नावावर 2 शतक आणि 14 अर्धशतक आहेत. तर 17 टेस्ट मॅचमध्ये त्याने 54 च्या सरासरीने 1084 रन केल्या आहेत ज्यात चार शतकांचा समावेश आहे.

देशांतर्गत किक्रेटबद्दल सांगायचे झाल्यास विनोद कांबळीचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने 129 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 9965 रन्स केले आहेत. ज्या दरम्यान त्याची सरासरी 59. 67 आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये विनोद कांबळीच्या नावावर 34 शतके आहेत. मात्र 29 ऑक्टोबर 2000 रोजी विनोद कांबळी भारताकडून शेवटचा खेळला होता.

काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी एका सायबर क्राईमचा बळी ठरल्याने प्रसिद्धी झोतात आला होता. केवायसी अपडेटच्या नावाखाली एका ऑनलाईन ठगाने बँक कर्मचारी असल्याचे भासवून विनोद कांबळी यांची सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

याप्रकरणी विनोद कांबळीने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सायबर पोलिसांनी कारवाई करत विनोद कांबळीला त्यांची रक्कम परत मिळवून दिली आहे.


Live Update : युक्रेनमधून 2000 भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यात यश, 249 नागरिकांना घेऊन 5 वे विमान दिल्लीला रवाना


First Published on: February 28, 2022 8:08 AM
Exit mobile version