FIFA 2018 : डिएगो कोस्टाच्या निर्णायक गोलमुळे स्पेनची इराणवर मात

FIFA 2018 : डिएगो कोस्टाच्या निर्णायक गोलमुळे स्पेनची इराणवर मात

फोटो सौजन्य- डेली पोस्ट

फिफाच्या बी गटातील स्पेन विरूद्ध इराण सामन्यात स्पेनने १-० ने विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघाना गोल करणे शक्य झाले नव्हते. इराणचा संघ स्पेनची आक्रमणं परतविण्यात यशस्वी झाला. मात्र हाफ टाइम नंतर स्पेनने आपली आक्रमक खेळी सुरू केली आणि त्यांना गोल करण्यात यश आले.

कझान स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच इराणने स्पेनविरूद्ध चांगला डिफेन्स केला. हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघांचा स्कोर ०-० होता. दुसऱ्या हाफमध्ये स्पेनकडून आक्रमक खेळ सुरू झाला आणि त्यांना गोल करत सामन्यात आपले वर्चस्व दाखवले. स्पेनचा फॉरवर्ड खेळाडू डिएगो कोस्टाने ५४ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यांनतर दोन्ही संघाकडून उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखवले गेले. मात्र इराणला गोल करता आला नाही आणि स्पेनने विजय मिळवला. स्पेनचा पहिला सामना पोर्तुगालसोबत बरोबरीत सुटला होता. मात्र आता इराणविरुद्ध स्पेनला विजय मिळाल्याने त्यांच्या खात्यात एकूण ४ गूण जमा झाले असून ते बी गटात अव्वलस्थानी पोहोचले आहेत.

गोलनंतर आनंद व्यक्त करताना डिएगो कोस्टा

इराणचा गोल झाला खरा पण…

स्पेनच्या संघांची आक्रमणे इराणने रोखली खरी मात्र ५४ व्या मिनिटाला डिएगो कोस्टाच्या गोलने स्पेनने मॅचमध्ये आघाडी घेतली. ६२ व्या मिनिटाला इराणकडून गोल झाला, मात्र रेफरीकडून नियमांचा दाखला देत तो गोल अपात्र ठरवला गेल्यामुळे इराणचा हिरमोड झाला.

इराण संघाचा खेळाडू
First Published on: June 21, 2018 3:42 PM
Exit mobile version