Neeraj Chopra: गोल्डन बॉयला अशी पाहिजे बायको

Neeraj Chopra: गोल्डन बॉयला अशी पाहिजे बायको

Neeraj Chopra: गोल्डन बॉयला अशी पाहिजे बायको

टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या गर्लफ्रेंडचे नाव इंटरनेंटवर सर्च होत आहे. अनेक जण त्यांच्या लग्नाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यामुळे नीरज चोप्रा कधी लग्न करणार असे प्रश्न अनेक मुलाखतीमध्ये त्याला विचारले जात आहे. अखेर आता गोल्डन बॉय नीरजने याचे उत्तर दिले आहे.

लवकरच नीरज चोप्रा डान्स प्लस सीझन ६मध्ये दिसणार आहे. या शोच्या प्रोमोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शोचा होस्ट राघव जुयाल प्रश्न विचारतो की, नीरज चोप्रासोबत आपली कुंडली कशी मॅच करायची? हा प्रश्न ऐकून नीरज चोप्रा थोडा लाजतो आणि हसत म्हणतो की, ‘याबाबत काही माहित नाही आहे.ट

पुढे अशा प्रकारच्या प्रश्नांचे सत्र संपले नाही. या शोचा परीक्षक पुनीत पाठक नीरजला म्हणाला की, सर्व मुलींच्या वतीने मी तुम्हाला प्रश्न विचारत की, ‘तुम्हाला कशाप्रकारची मुलगी आवडते?’ या प्रश्नाचे नीरज उत्तर देण्यापूर्वी राघव म्हणतो की, ‘जॅवलिनसारखी.’ यावर नीरज हसत म्हणतो की, ‘नको-नको. एवढ्या लांब उंचीची काय करायची? ती खूप लांब होईल. सध्या असं काही नाही आहे. परंतु एक खेळाडू असल्यामुळे माझी इच्छा आहे की, ती एक खेळाडू असायला पाहिजे. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत असणारी आणि दुसऱ्यांचा आदर करणारी असावी. तसेच कुटुंबियांचा सन्मान करणारी असावी.’


हेही वाचा – भज्जी आणि गीताच्या मुलाच्या नावाची जोरदार चर्चा


 

First Published on: September 27, 2021 5:39 PM
Exit mobile version