Harbhajan Singh on MS Dhoni: संघातून का वगळे अद्याप समजले नाही, हरभजन सिंगने व्यक्त केली खंत

Harbhajan Singh on MS Dhoni: संघातून का वगळे अद्याप समजले नाही, हरभजन सिंगने व्यक्त केली खंत

Harbhajan Singh on MS Dhoni: संघातून का वगळे अद्याप समजले नाही, हरभजन सिंगने व्यक्त केली खंत

भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. निवृत्तीनंतर हरभजन सिंगने भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हरभजनने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरही काही मोठे आरोप केले आहेत. त्याला संघातून का वगळण्यात आले याचे कारण सांगण्यात आले नाही, असे हरभजन म्हणाला.

हरभजन म्हणाला की, मी ३१ वर्षांचा होतो, तेव्हा मी कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. वयाच्या ३१ व्या वर्षी मी ४०० विकेट्स घेतल्या तर पुढच्या ८-९ वर्षात मी आणखी किमान १०० विकेट्स घेऊ शकलो असतो याची मला खात्री होती. मात्र मला संधीच देण्यात आली नाही. मोठी गोष्ट म्हणजे माझी निवडही झाली नाही, असे हरभजन म्हणाला.

ज्या खेळाडूने ४०० विकेट घेतल्या आहेत, त्याला बाहेर कसे बसवले जाऊ शकते, हे आश्चर्यकारक आहे. याचा खुलासा अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षात काय घडले? मला संघात असण्यात कोणाला समस्या होती? मला अजूनही या सर्व गोष्टींचे आश्चर्य वाटते, असं हरभजन म्हणाला.

हरभजन म्हणाला, मी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोरही माझी बाजू मांडली, पण मला उत्तर मिळाले नाही. तेव्हाच मला समजले की माझ्या हकालपट्टीसाठी कोणतेही कारण दिले जाणार नाही. यामागे कोण आहे, हेही कळू शकलेले नाही. वारंवार विचारूनही उत्तर मिळाले नाही, तेव्हा मी ते बोलणे थांबवलेले.

निवृत्तीची घोषणा करताना ४१ वर्षीय हरभजनने लिहिले होते, मी त्या खेळाला अलविदा म्हणत आहे ज्याने मला आयुष्यात सर्व काही दिले आहे, सर्व चांगल्या गोष्टींचाही अंत होतो. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी २३ वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अद्भुत आणि संस्मरणीय बनवला. आपल्या कारकिर्दीत, हरभजनने १०३ कसोटींमध्ये ४१७ विकेट्स, २३६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६९ बळी आणि २८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५ बळी घेतले आहेत.


हेही वाचा : Under 19 Asia Cup: श्रीलंकेला ८ वेळा पराभूत करत भारताने जिंकला एशिया कप, वर्ल्डकपसाठी संघ तयार

First Published on: December 31, 2021 9:38 PM
Exit mobile version