भारतासाठी खेळण्यास तयार!

भारतासाठी खेळण्यास तयार!

अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग पुन्हा भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेट खेळण्यास तयार आहे. जुलैमध्ये ४० वर्षांचा होणारा हरभजन २०१६ पासून भारतासाठी खेळलेला नाही. परंतु, यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास भारतीय संघात पुनरागमन करण्याचा हरभजनला विश्वास आहे. मी पुनरागमनासाठी तयार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास मी राष्ट्रीय संघात परतू शकतो. आयपीएल ही गोलंदाजांसाठी आव्हानात्मक स्पर्धा आहे. कारण सामने छोट्या मैदानांवर होतात, जिथे सीमारेषा जवळ असते आणि या स्पर्धेत सर्वच आघाडीचे फलंदाज खेळतात. त्यांना रोखणे अवघड असते. त्यामुळे या स्पर्धेत दमदार कामगिरी केलीत, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तुम्ही चांगली कामगिरी करू शकता, असे हरभजन म्हणाला.

First Published on: May 26, 2020 4:10 AM
Exit mobile version