Test Squad: पुजारा आणि रहाणेला श्रीलंकेतील कसोटी मालिकेत संधी मिळणं कठीण ? दिग्गज खेळाडूचा खुलासा..

Test Squad: पुजारा आणि रहाणेला श्रीलंकेतील कसोटी मालिकेत संधी मिळणं कठीण ? दिग्गज खेळाडूचा खुलासा..

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. यामध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने सेंच्युरियन कसोटी सामन्यात ११३ धावा काढल्या होत्या. परंतु इतर दोन सामने त्यांना हातातून गमवावे लागले. मालिकेत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने टीमच्या प्रदर्शनाबद्दल सांगितलं आहे. भज्जीच्या मते, टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध २५ जानेवारी रोजी आगामी कसोटी मालिका खेळणार आहे. परंतु त्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

हरभजन सिंगने तीन सामन्यांमधील मयंक अग्रवालवर टीका केली. दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या संधीचं सोनं खेळाडू करू शकले नाहीत. भज्जीने दोन सलामीवीर फलंदाजांचं नाव घेतलं. मयंक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरोधात २२.५० च्या सरासरीत १३५ धावा काढल्या आहेत.

हरभजनने आपल्या युट्यूब चॅनलवरून सांगितलं की, मयंक अग्रवालला खेळण्यासाठी सहा डाव मिळाले. परंतु तो संधी साधू शकला नाही. त्यामुळे त्याच्याजागी दुसरा नवीन खेळाडू येऊ शकतो. शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ या दोन खेळाडूंना मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. कारण एका खेळाडूसाठी सहा डाव खेळणे पुरेसे आहेत. मात्र, त्याने चांगला स्कोर न केल्यामुळे त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

पुजारा-रहाणेंना संधी मिळणं कठीण

हरभजनने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारावर सुद्धा प्रतिक्रिया दिलीय. पुजारा आणि रहाणेला श्रीलंकेतील कसोटी सामन्यात संधी मिळणं फार कठीण असल्याचं भज्जीने सांगितलं आहे. रहाणे आणि पुजाराने ५० धावांची भागिदारी केली. परंतु सीनियर्सला यापेक्षाही अधिक अपेक्षा असतात. त्यामुळे माझ्या मते, पुजारा-रहाणेला पुढील रस्ता मिळणं फार कठीण होणार आहे, असं भज्जी म्हणाला.


हेही वाचा : OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी १९ जानेवारीला


 

First Published on: January 17, 2022 4:24 PM
Exit mobile version