हॅरी केनने मिळवला ‘गोल्डन बूट’

हॅरी केनने मिळवला ‘गोल्डन बूट’

इंग्लंड संघांच कर्णधार हॅरी केन

रशियात पार पडलेल्या फिफा विश्वचषक २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी केनला गोल्डन बूटने सन्मानित करण्यात आले आहे. त्याने संपूर्ण विश्वचषकात सर्वाधिक ६ गोल केले आहेत. विश्वचषकाच्या सेमी-फायनलमधून इंग्लंडला जरी बाहेर जावे लागले असले. तरी त्यांच्या कर्णधाराने मिळवलेल्या या सन्मानाने इंग्लंडमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


इंग्लंड संघाकडून विश्वचषकात हॅरीने खेळलेल्या ६ सामन्यात त्याने ६ गोल केले आहेत. सर्वात आधी त्याने गटफेरीच्या सामन्यात टय़ुनियाशिविरुद्ध २ गोल केले. पनामाविरूद्ध हॅट्रीक नोंदवत ३ गोल केले. त्यानंतर कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातही केनने १ गोल केला आणि विश्वचषकात सर्वाधिक ६ गोल नोंदवले. हॅरी पोठोपाठ पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोने, रशियाचा डेनिस चेरिशेवनेही आणि बेल्जियमचा रोमेलू लुकाकूनेही प्रत्येकी ४ गोल केले होते. तर अंतिम सामन्यात फ्रान्सच्या ग्रीझमनने केलेल्या गोलमुळे तोही या स्पर्धेत पुढे आला आणि ४ गोलसह त्याने सिल्वर बूट मिळवला. मात्र हॅरीचे गोल या सर्वांहून अधिक असल्याने त्याला गोल्डन बूटने सन्मानित करण्यात आहे.

फिफा विश्वचषक २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू

तब्बल ३२ वर्षानंतर इंग्लंडला मिळाला गोल्डन बूट

विश्वचषकाच्या स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल केल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला गोल्डन बूट देण्यात आला. त्याने एकूण ६ सामन्यात सर्वाधिक ६ गोल केले. विशेष म्हणजे याआधी तब्बल ३२ वर्षापूर्वी इंग्लंडला हा मान मिळाला होता. १९८६ साली झालेल्या फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडच्या गॅरी लिनेकेरने ‘गोल्डन बूट’ जिंकला होता.

गॅरी लिनेकेर
First Published on: July 16, 2018 5:42 PM
Exit mobile version