हिमा दासची पूरग्रस्तांसाठी धाव

हिमा दासची पूरग्रस्तांसाठी धाव

हिमा दास

आसाम राज्यात सध्या पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेल्याने आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली आहे. त्यामुळे आसाममधील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सुवर्ण पदक विजेती भारतीय धावपटू हिमा दास हिने मदतीचा हात पुढे केला आहे.

धावपटू हिमा दास सध्या चेक रिपब्लिकमध्ये अ‍ॅथलिट मिटसाठी गेली आहे. मात्र, असे असूनही हिमाने सामाजिक भान राखले आहे. तिने तिच्या महिन्याच्या वेतनातील अर्धे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. याशिवाय हिमाने इतर नागरिकांना देखील आसाम पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ‘आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ३३ पैकी ३० जिल्हे पुरामुळे बाधित आहेत. त्यामुळे मी कार्पोरेट कंपन्या, मोठे उद्योजक आणि सामान्य नागरिकांना विनंती करते की त्यांनी आसाम पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात द्यावा’, असे तिने ट्विट केले आहे.

First Published on: July 18, 2019 4:13 AM
Exit mobile version