Hockey World Cup 2023 : भारताची 8-0 च्या फरकाने जपानवर मात

Hockey World Cup 2023 : भारताची 8-0 च्या फरकाने जपानवर मात

भारतीय हॉकी संघ विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर गेला असला तरी, कामगिरी उत्तम करत आहे. नुकताच भारताने जपानचा पराभव केला. हॉकी विश्वचषकात काल भारत आणि जपान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 8-0च्या फरकाने जपानचा पराभव केला आहे. सध्या सुरु वर्गीकरण सामन्यात (Classification Matches) भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. (hockey world cup 2023 team India beat japan by 8 0 in wc India vs japan)

भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेबाहेर जावे लागले. भारतीय भूमीत सुरु असणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये (Hockey World Cup 2023) कालपासून (26 जानेवारी) वर्गीकरण सामने खेळवण्यास सुरूवात झाली आहे. वर्गीकरण सामने म्हणजे जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांच्यात आता अधिक चांगलं स्थान मिळविण्यासाठी सामने खेळवले जाणार आहेत.

आज नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील विजयी संघ पुढे जाऊन नवव्या ते बाराव्या स्थानासाठी सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर पराभूत संघाला तेराव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळावे लागणार आहेत.

त्यानुसार, काल भारतीय संघाने (Team India) वर्गीकरणाच्या सामन्यासाठी जपानविरुद्ध मैदानात उतरला. या सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने अप्रतिम खेळी केली. परंतु, जपानच्या संघाला एकही गोल करता आला नाही परिणामी भारताने 8-0 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकला.

भारतीय हॉकी संघ?

अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.


हेही वाचा – इंग्लंडचा बेन स्टोक्स ठरला ‘आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’

First Published on: January 27, 2023 8:42 AM
Exit mobile version