मी कुठेही बॅटिंग करण्यासाठी तयार – धोनी

मी कुठेही बॅटिंग करण्यासाठी तयार – धोनी

महेंद्रसिंग धोनी

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवून देण्यामध्ये महेंद्र सिंग धोनीचा मोठा वाटा होता. यासाठी त्याला मॅन ऑफ द सिरिज निवडण्यात आले. या सिरिजमधील तिन्ही सामन्यांमध्ये धोनीने अर्धशतक करत एक चांगली खेळी खेळली. भारताने ही सिरिज २-१ ने जिंकली. मॅन ऑफ द सिरिजचा खिताब घेतांना टीम इंडियासाठी कुठेही बॅटिंग करण्यास तयार असल्याचे धोनी म्हणाला आहे. सिरिजमधील पहिल्या दोन सामन्यात धोनी ५ क्रमांकावर बॅटिंग करत होता तर शेवटच्या सामन्यात धोनी ४ थ्या क्रमांकावर बॅटिंग करत होता.

काय म्हणाला धोनी

“गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे बॅटिंग करणे थोडे कठीण झाले होते. कोणत्याबी बॉलरचा शॉर्ट खेळण्यासाठी आम्हाला अधिक लक्ष द्यावे लागत होते. अशा सामन्यांमध्ये कोणतीही चूकी न करता शेवटपर्यंट टिकूण राहाणे हे आमच्या साठी महत्वाचे होते.”- खेळाडू महेंद्र सिंग धोनी

First Published on: January 18, 2019 7:59 PM
Exit mobile version