मी दोघांमध्ये मैत्री करायला तयार; विराट-गंभीर वादावर रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया

मी दोघांमध्ये मैत्री करायला तयार; विराट-गंभीर वादावर रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (1 मे) पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यातील सामन्यापेक्षा विराट (Virat) आणि गंभीर (Gambhir) यांच्यातील वाद जास्त चर्चेत आला. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी दोघांमध्ये मैत्री करायला तयार आहे.

लखनऊच्या एकना स्टेडियमवर सोमवारी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादावर आजही चर्चे होत आहे. सामना संपल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर आले. प्रकरण वाढत असल्याचे पाहिल्यावर दोन्ही संघांचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळे केल्यानंतर प्रकरण शांत केले. मात्र आता क्रिकेट चाहत्यांचे दोन गट झाले आहेत. काहीजण कोहलीच्या बाजूने बोलत आहेत तर, काही चाहते गंभीरची बाजू घेत आहेत. यावेळी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका टीव्ही कार्यक्रमात रवी शास्त्री म्हणाले की, हा वाद एक-दोन दिवसांत शांत झाल्यावर विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या लक्षात येईल की, हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळता आले असते. दोघेही दिल्लीसाठी भरपूर क्रिकेट खेळले आहेत. गौतम दुहेरी विश्वचषक विजेता आहे तर, विराट आयकॉन आहे. त्यामुळे मला वाटते की, दोघांनीही एकत्र बसवून हा वाद कायमचा संपवायला पाहिजे. कारण जो कोणी हा वाद संपवण्याचा प्रयत्न करेल, ते तितके चांगले आहे, कारण हा वाद आणखी वाढून जगासमोर यावे असे दोघांनाही वाटत नसेल. या दोघांमधील वाद असाच सुरू राहिला तर पुढच्या वेळी ते पुन्हा मैदानात भेटतील तेव्हा शब्दांची देवाणघेवाण होईल आणि हा वाद आणखी वाढू शकतो आणि एका वादामुळे दुसरा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा वाद जितक्या लवकर संपेल तितके चांगले. जर मला या दोघांमधील वाद संपवायला सांगितल्यास मी तयार आहे आणि या दोघांमध्ये मैत्री करायलाही मी तयार असल्याचे रवी शास्त्री म्हणाले.

वाद सुरूवात कुठून झाली
लखनऊ जायंट्स संघाच्या डावातील 17व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि त्याने नवीनला काहीतरी इशारा केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. त्यावर नवीन त्याच्या जवळ आला वाद घालू लागला. या वादादरम्यान विराटने आपल्या बुटाकडे बोट दाखवत इशारा केला. त्यानंतर वाद वाढू लागल्यानंतर बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता विराट आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना विराट नवीनला काहीतरी बोलला. नवीनने विराटला उत्तर दिले आणि विराटनेही त्याला पुन्हा उत्तर दिल्यामुळे नवीन विराटच्या दिशेने वळला. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने नवीनला दूर केल्यानंतर विराट सीमारेषेच्या दिशेने निघून गेला. यावेळी मेयर्स कोहलीजवळ आला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. तेव्हा गंभीरने मेयर्सला ओढत बाजूला केले. यानंतर विराट डुप्लेसीशी बोलू लागला आणि गंभीरशी लांबूनच हातवारे करत काहीतरी बोलत होता. त्याच्या बोलण्याला गंभीरही उत्तर देत होता. मात्र यावेळी गंभीरचा पारा चढलेला होता. त्याला केएल राहुलने शांत करण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी विराट गंभीरकडे गेला आणि वाद घालू लागला. प्रकरण वाढत असल्याचे पाहिल्यावर दोन्ही संघांचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळे केल्यानंतर प्रकरण शांत केले. यानंतर विराट आणि लोकेश राहुल यांच्यात दीर्घ संवादही पाहायला मिळाला.

2013 मध्येही दोघांमध्ये वाद
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात आयपीएल 2013 मध्येही वाद झाला होता. तेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता, तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार होता. या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात विराट बाद झाला आणि त्याला यावर विश्वास बसत नसल्यामुळे तो निराश होऊन क्रीजवर उभा राहिला. अशा स्थितीत गंभीरने विराटला अपशब्द बोलले की, तू मैदानाबाहेर का जात नाहीस. विराटला नीट ऐकू न आल्याने त्याने गंभीरला विचारले तू काय बोलतो आहेस. यावर गंभीरने शिवीगाळ करत आपला मुद्दा पुन्हा सांगितला. याला उत्तर देताना विराटने काही अपशब्दचा वापर केला. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या खूप जवळ आले. यानंतर इतर खेळाडूंनी आणि पंचांनी दोघांना वेगळे केले.

First Published on: May 3, 2023 1:14 PM
Exit mobile version