IND vs ENG : पुजाराने द्विशतक करावे अन् भारताने डे-नाईट कसोटी जिंकावी ही इच्छा!

IND vs ENG : पुजाराने द्विशतक करावे अन् भारताने डे-नाईट कसोटी जिंकावी ही इच्छा!

चेतेश्वर पुजारा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. डे-नाईट होणारा हा कसोटी सामना अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. सामन्याच्या आधी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या स्टेडियमचे उद्घाटन केले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू हेदेखील उपस्थित होते. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून याचे अमित शहा यांनी कौतुक केले. तसेच चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक करावे आणि भारताने हा सामना जिंकावा अशी आपली इच्छा असल्याचेही यावेळी शहा म्हणाले.

श्रीनाथ सामनाधिकारी असल्याचा आनंद

भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाईट कसोटीत जवागल श्रीनाथ सामनाधिकारी म्हणून काम करणार असल्याचा मला आनंद आहे. श्रीनाथ यांनी या स्टेडियममध्ये अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा विकेट घेतल्या होत्या. याच मैदानावर कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला होता. तसेच सुनील गावस्कर यांनी याच मैदानावर १० हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला होता, तर सचिन तेंडुलकरने १८ हजार एकदिवसीय धावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्षे पूर्ण केली होती. आता पुजाराने द्विशतक करावे आणि भारतीय संघाने हा सामना जिंकावा अशी माझी इच्छा असल्याचे शहा उद्घाटन समारंभात म्हणाले.

First Published on: February 24, 2021 6:14 PM
Exit mobile version