रिषभ पंतविना भारतीय संघाचा विचारही अवघड, इयन बेलने केली यष्टीरक्षक-फलंदाजाची स्तुती

रिषभ पंतविना भारतीय संघाचा विचारही अवघड, इयन बेलने केली यष्टीरक्षक-फलंदाजाची स्तुती

रिषभ पंतविना भारतीय संघाचा विचारही अवघड, इयन बेलने केली यष्टीरक्षक-फलंदाजाची स्तुती

रिषभ पंतविना आता भारतीय संघाचा विचारही करणे अवघड आहे, असे म्हणत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयन बेलने भारताच्या युवा यष्टीरक्षक-फलंदाजाची स्तुती केली. पंतने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली. यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी पंतला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, इंग्लंडविरुद्ध त्याचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आता पंतला संघातून वगळणे भारताला अश्यकच झाल्याचे बेल म्हणाला.

पंतविना आता भारतीय संघाचा विचारही करणे अवघड आहे. तो भारतीय संघाचे भविष्य आहे आणि त्याला भारतीय संघात काही उत्कृष्ट खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत आहे. या अनुभवाचा त्याला नक्कीच फायदा होईल. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत आपल्याला अधिक परिपक्व झालेला पंत पाहायला मिळाला. त्याने आक्रमक शैलीतच फलंदाजी केली. मात्र, तो चुकीचे फटके मारत नव्हता. पंत हा फारच प्रतिभावान खेळाडू आहे आणि असे खेळाडू सारखे घडत नाहीत. तो त्याच्या कारकिर्दीत यशस्वी होईल याची मला खात्री आहे. तो एक मॅचविनर आहे, असे बेलने सांगितले.

रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंतने ६२ चेंडूत ७८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पंतने तिन्ही मालिकांमध्ये (कसोटी, टी-२०, एकदिवसीय) आपली छाप पाडली. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तो आक्रमक शैलीत खेळला असला तरी त्याने धोका पत्करला नाही. त्याने एक-दोन धावा काढून धावफलक हलता ठेवला. तसेच जेव्हा गोलंदाजाने चूक केली, तेव्हा पंतने त्याचा पुरेपूर फायदा घेत चौकार-षटकार मारले, असेही बेल म्हणाला.

First Published on: March 29, 2021 10:38 PM
Exit mobile version