ICC Men’s T20I Team of the Year : आयसीसीकडून २०२१ च्या बेस्ट टी-२० प्लेइंग इलेव्हनची घोषणा, भारतीय खेळाडूंचा समावेश नाही

ICC Men’s T20I Team of the Year : आयसीसीकडून २०२१ च्या बेस्ट टी-२० प्लेइंग इलेव्हनची घोषणा, भारतीय खेळाडूंचा समावेश नाही

ICC Men's T20I Team of the Year : आयसीसीकडून २०२१ च्या बेस्ट टी-२० प्लेइंग इलेव्हनची घोषणा, भारतीय खेळाडूंचा समावेश नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) कडून २०२१च्या बेस्ट टी-२० संघाची घोषणा केली आहे. मागील वर्षाच्या आयसीसी अवॉर्डसची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या अवॉर्ड्सच्या पार्श्वभूमीव एक-एक करुन मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे समोर येत आहेत. आईसीसीच्या बेस्ट टी-२० प्लेइंग इलेव्हनच्या संघाची कमान बाबर आजमच्या हाती गेली आहे. भारतातील एकाही खेळाडूचा या टीममध्ये समावेश करण्यात आला नाही आहे.

आयसीसी बेस्ट टी-२० प्लेइंग इलेव्हनमध्ये पाकिस्तानच्या संघाचे तीन खेळाडू आहेत. यामध्ये बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर) आणि शाहीन अफरीदी वेगवान गोलंदाज या तीन खेळाडूंचा समावेश आहे. मागील वर्षी बाबर- रिजवानच्या जोडीनं उत्कृष्ट खेळी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विश्वचषकात दोघांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक धावा काढल्या होत्या. यामुळे या दोन खेळाडूंची नावे यादीत सामील करण्यात आली आहेत.

यूएईमध्ये खेळवण्यात आलेला टी-२० विश्वचषकावर ऑस्ट्रेलियना आपेल नाव कोरलं आहे. वर्ल्डकप चॅम्पियन टीममधून केवळ २ खेळाडूंची नावे बेस्ट टी२० प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आली आहेत. भारताबाबत बोलायचे झाले तर रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रोहितने ४२४ धावा केल्या होत्या परंतु पूर्ण यादीमध्ये टॉप १० मध्येही नाव नव्हते.

टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी खराब होती. सुरुवातीच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने सामने जिंकले परंतु उपांत्य फेरीत मजल मारता आली नाही. टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.

२०२१ची बेस्ट आईसीसी टी-२० प्लेइंग इलेव्हन

जॉस बटलर, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), बाबर आजम, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेविड मिलर, तबरेज शम्सी, जोश हेजलवुड, वानिंदु हसारंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहीन अफरीदी.


हेही वाचा : Sania Mirza Retirement : टेनिसपटू सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा,म्हणाली…

First Published on: January 19, 2022 4:49 PM
Exit mobile version