Test Rankings : होल्डरला मागे टाकत रविंद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी

Test Rankings : होल्डरला मागे टाकत रविंद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी

रविंद्र जाडेजा कसोटीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी

भारताच्या रविंद्र जाडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, जाडेजाने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. होल्डरला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे त्याचे २८ गुण कमी झाले असून ३८४ गुणांसह त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. याचा फायदा जाडेजाला झाला असून त्याने ३८६ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. जाडेजा याआधी ऑगस्ट २०१७ मध्ये कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर होता.

रविंद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी

डी कॉक अव्वल दहा फलंदाजांमध्ये

नुकतीच वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेत होल्डरला चार डावांमध्ये मिळून केवळ ३४ धावा करता आल्या, तर गोलंदाजीमध्ये तो तीन डावांमध्ये केवळ सहा विकेट घेऊ शकला. त्यामुळे त्याची कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या कसोटीत शतक आणि दुसऱ्या कसोटीत ९६ धावांची खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला फलंदाजांमध्ये दोन स्थानांची बढती मिळाली आहे. तो ७१७ गुणांसह दहाव्या स्थानी पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बढती

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरलाही एका स्थानाची बढती मिळाली असून तो १९ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. याचा त्याला फायदा झाला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी वॅन डर डूसेनला तब्बल ३१ स्थानांची बढती मिळाली असून त्याने ३१ वे स्थान पटकावले आहे.

First Published on: June 23, 2021 5:00 PM
Exit mobile version