बाद फेरीत जाण्यासाठी आज शेवटचे सामने

बाद फेरीत जाण्यासाठी आज शेवटचे सामने

फिफा विश्वचषक २०१८

फिफा विश्वचषकाचा साखळी सामन्यांचा पहिला टप्पा जवळजवळ संपत आला आहे. आज बाद फेरीत पोहोचण्यासाठीचे शेवटचे सामने एच आणि जी गटात होणार आहेत. आतापर्यंत बाद फेरीत जाण्यासाठीचे सर्वच सामने अत्यंत अटीतटीचे झाले आहेत. गतवर्षीचे विजेते जर्मनीसारख्या संघाच्या बाहेर जाण्याने कळून येते की यावर्षीच्या विश्वचषकात किती चढाओढ आहे. आजही असेच काही सामने होणार आहेत.

सर्वात आधी भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० ला एच गटातील जपान आणि पोलंड यांच्यात सामना होणार आहे. पोलंडने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले असल्याने त्यांचा यावर्षीचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिक असणार आहे. तर दुसरीकडे जपान संघाचा सेनेगल सोबतचा शेवटचा सामना बरोबरीत सुटल्याने त्यांची बाद फेरीत जाण्याच्या आशा अजूनही कायम आहे. जपान संघांचा भार हा त्यांचा स्टार खेळाडू ‘कागावा’वर असणार आहे. तर त्याचवेळी सुरु असणारा दुसरा एफ गटातील सामना आहे सेनेगल आणि कोलंबिया.
कोलंबियाने आपल्या विश्वचषकाचा पहिला सामना गमावला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पोलंडला ३-० च्या मोठ्या फरकाने पराभूत केल्यामुळे त्यांचे गुण चांगले आहेत. त्यामुळे त्यांनी आजचा सामना जिंकला तर ते थेट बाद फेरीत जातील. तर दुसरीकडे सेनेगलला बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आजचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

जपान आणि सेनेगल सामन्यातील एक चुरशीचा क्षण

यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० ला गटातील सामने होणार आहेत. ज्यात पनामाविरूद्ध ट्युनिशिया असा सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघानी विश्वचषकातील आतापर्यंतचे सर्व सामने गमावल्यामुळे ते याआधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यामुळे हा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. तर याचवेळी गटातील दुसरा सामना इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ आपल्या उत्तम प्रदर्शनामुळे याआधीच बाद फेरीत पोहोचले असून आता त्यांच्यातील कोण जास्त गुणांसह बाद फेरीत जातो, हे पाहाण्याजोगे असेल.

बेल्जियम आणि इंग्लंडचा संघ
First Published on: June 28, 2018 7:25 PM
Exit mobile version