बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 2 खेळाडू संघाबाहेर

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 2 खेळाडू संघाबाहेर

भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्घ दोन सामन्यांचा कसोटी सामना खेळत आहे. यामध्ये भारतीय संघाने पहिला सामना जिंकून कसोटीत 1-0ने आघाडी घेतली. त्यात आता दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला सुरू होणार आहे. या सामन्यापुर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. रोहित शर्मासोबतच वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही संघातून वगळण्यात आले आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. (ind vs ban rohit sharma and navdeep saini ruled out of second test against bangladesh bcci tweet)

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्विट करून याबाबतचा दुजोरा दिला आहे.

अंगठ्याला दुखापत

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या डाव्या अंगठ्याच्या दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघातून बाहेर झाला होता. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. रोहित शर्माची दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे वैद्यकीय पथकाचे मत आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी तो उपलब्ध असणार नाही आहे, असे बीसीसीआयने पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. चितगाव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तसेच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ :

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट


हेही वाचा – 

First Published on: December 20, 2022 6:25 PM
Exit mobile version