मुरली विजय ठरला सहावा फलंदाज

मुरली विजय ठरला सहावा फलंदाज

सौजन्य - डेक्कन क्रोनीकल

भारताचा सलामीवीर मुरली विजय इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतही खाते न खोलताच आउट झाला असून ही कामगिरी करणारा तो भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे एकाच डावात दोन्ही वेळेस त्याला जेम्स अँडरसननेच बाद केले आहे. याआधी भारताच्या पाच बॅट्समन्सनी एकाच डावात दोनवेळेस शून्यावर आपली विकेट टाकली असून मुरली विजय ही कामगिरी करणार सहावा बॅट्समन ठरला आहे.

दुसऱ्या सामन्यातही भारताची नाव धोक्यात

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मलिका सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सान्यातही भारताला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही. भारताचा पहिला डाव १०७ धावांत आटोपला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी गड चांगलाच लढवला. त्यांनी प्रत्युत्तरात ७ बाद ३९६ धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडकडून सर्वाधिक ख्रिस वोक्सने १३७, बेअरस्टोने ९३ धावा केल्या तर सॅम कुरनने ४० धावा करत भारतासमोर २४१ धावांचे आव्हान ठेवला आहे. भारताच्या फलंदाजाना दुस-या डावातही साजेशी सुरूवात करता आलेली नाहीये. भारताचा सलामीवीर मुरली विजय तिसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाल्याने भारताला डावाच्या सुरूवातीलाच धक्का बसला.

मुरली ठरला सहावा बॅट्समन

टेस्ट मॅचच्या एकाच डावात दुसऱ्यांदा शून्यावर बाद होणारा मुरली भारताचा सहावा बॅट्समन ठरला आहे. याआधी सर्वात पहिल्यांदा १९५२ मध्ये पी रॉय हे भारताचे माजी खेळाडू मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात एकाच डावात दोनदा शून्यावर बाद झाले होते. तर त्यानंतर १९७५ मध्ये एफ इंजिनीयर यांना वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात एकाच डावात दोनदा शून्यावर बाद करण्यात आल होता. त्यानंतर २००७ मध्ये वसीम जाफर बांग्लादेशविरूद्ध एकाच डावात दोनदा शून्यावर बाद झाला होता. २०११ मध्ये इंग्लंडविरूद्ध विरेंद्र सेहवाग एकाच सामन्यात दोनदा शून्यावर बाद झाला होता. भारताचा सध्याचा सलामीवीर शिखर धवनही दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २०१५ मध्ये दोनदा शून्यावर बाद झाला असून या सर्वानंतर आता मुरली विजय हा सहावा भारतीय बॅट्समन ठरला आहे. ज्याला एकाच डावात दोनदा शून्यावर बाद व्हावे लागले आहे.

First Published on: August 12, 2018 8:02 PM
Exit mobile version