India vs England Test : कोहली आणि पुजाराचं अर्धशतक

India vs England Test : कोहली आणि पुजाराचं अर्धशतक

सौजन्य- bcci twitter

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने चांगला खेळ करत दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ अवघ्या १६१ धावांत ऑलआउट झाला. इंग्लंडला ऑलआउट करण्यात महत्त्वाचा वाटा पांड्याचा असून पांड्याने अप्रतिम बॉलिंग करत तब्बल पाच विकेट्स घेतल्या आहेत. पांड्याने अवघ्या ६ ओव्हर्समध्ये २८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. पांड्याच्या या कामगिरीमुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेरीस २९२ धावांची भक्कम आघाडी घेता आली आहे. ज्यानंतर भारताने दुसऱ्या डावात बॅटिंग करताना २ विकेट्स गमावत १२४ धावा केल्या आहेत.

हार्दीक पांड्या

भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावात सुरूवातीपासूनच अप्रतिम बॉलिंग करत इंग्लंडचे सलामीवीर कूक आणि जेनिंग्स यांना बाद करत भारताला ५४ धावांवर २ विकेट्स मिळवून दिल्या. कूकची विकेट इशांतने तर जेनिंग्सची विकेट बुमराहने घेत भारताला पहिली आघाडी मिळवून दिल्या आहेत. त्यानंतर पांड्याने जो रूट (१६), जॉनी बेअरस्टो (१५), ख्रिस वोक्स (८), आदिल रशीद (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) धावांवर बाद करत भारताला १२८ वर ९ विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर अखेर बटलरला बुमराहने ४१ धावांवर बाद करत इंग्लंडला १६१ धावांत ऑलआउट केले. प्रत्युत्तरादाखल भारताने बॅटिंग करताना शिखर आणि राहुलने चांगली सुरूवात केली. त्यांच्या विकेटनंतर पुजारा आणि कर्णधार कोहली बॅटिंग करत असून भारताची अवस्था २ बाद १२४ आहे.

First Published on: August 20, 2018 10:06 AM
Exit mobile version