Ind vs Eng 3rd test : जिंकलो रे! भारताने इंग्लंडचा २०३ धावांनी उडवला धुव्वा

Ind vs Eng 3rd test : जिंकलो रे! भारताने इंग्लंडचा २०३ धावांनी उडवला धुव्वा

भारतीय संघ

जिंकलो! इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतानं शानदार विजय मिळवला आहे. नॉटिंगहॅममध्ये रंगलेल्या या कसोटीसामन्यामध्ये भारतानं इंग्लंडचा २०३ धावांनी पराभव केला आहे. ५२१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या ३१७ धावांमध्ये गारद झाला. तिसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळवत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत २-१ ने पिछाडीवर आहे. भारतानं दिलेल्या ५२१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॉस बटलरनं शानदार १०६ धावांची खेळी केली. पण बटलर आणि स्टोक्सची जोडी फोडली ती जसप्रित बुमराहनं. स्टोक्सनं देखील सुरेख अशी ६२ धावांची खेळी केली. बटलर आणि स्टोक्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज भारताच्या माऱ्यापुढे तग धरू शकला नाही. नॉटिंगहॅममध्ये मिळवलेला विजय भारतीय संघाचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. पहिले दोन्ही कसोटी सामने गमावल्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. शिवाय बीसीसीआयने देखील प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीला जाब विचारला होता. त्यानंतर नॉटिंगहॅम कसोटीमध्ये भारतानं शानदार कामगिरी केली आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी भारताला आता पुढील दोन्ही कसोटींमध्ये विजय गरजेचा आहे. नॉटिंगहॅममध्ये मिळवलेला विजय भारतासाठी नक्कीच मनोबल वाढवणारा ठरणारा आहे. त्याचा फायदा हा भारताला पुढील कसोटी सामन्यांमध्ये होणार आहे.

भारतानं उभारला डावांचा डोंगर

नॉटिंगहॅममध्ये भारतानं पहिल्या डावामध्ये ३२९ धावा केल्या. पण, इंग्लंडचा संघ अवघ्या १६१ धावांमध्ये गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये भारतानं ७ बाद ३५२ धावांवर दुसरा डाव घोषित करत विजयासाठी इंग्लंडला ५२१ धावांचे आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ अवघ्या ३१७ धावांमध्ये गारद झाला. दुसऱ्या डावामध्ये कर्णधार विराट कोहलीने शानदार १०३ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील विराटचे हे २३ वे शतक आहे. पहिल्या डावामध्ये देखील विराटने ९७ आणि अजिंक्य रहाणेने ८१ धावांची खेळी करत भारताच्या धावसंख्येमध्ये मोलाची भर घातली. पहिल्या डावामध्ये विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं केलेली भागीदारी ही भारतासाठी महत्त्वाची ठरली.

गोलंदाज कसोटीला खरे उतरले

भारतीय फलदाजांनी तर आपली कामगिरी चोख बजावली. पण खरी कसोटी होती ती गोलंदाजांची. गोलंदाजांनी देखील आपली कामगिरी चोख बजावली. दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. त्याने २९ षटकात ८५ धावांत ५ बळी घेतले. तर इशांत शर्माने २ बळी, हार्दिक पांड्याने १ आणि अश्विनने १ बळी घेतला. तर पहिल्या डावातदेखील भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला अवघ्या १६१ धावांत ऑल आऊट केले होते. या डावात ऑल राऊंडर हार्दीक पांड्याने इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता.जोस बटलरने काही काळ झुंज दिली. पण फटके मारण्याच्या नादात तो देखील सर्वाधिक ३९ धावा करून बाद झाला. हार्दिकने केवळ २८ धावांत ५ बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराने यांनी प्रत्येकी २ आणि मोहम्मद शमीने १ बळी टिपला. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने पाच झेल टिपले.

 

First Published on: August 22, 2018 5:49 PM
Exit mobile version