IND vs ENG : इंग्लंडच्या अचूक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले; 230 धावांचे आव्हान

IND vs ENG : इंग्लंडच्या अचूक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले; 230 धावांचे आव्हान

लखनऊ : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29व्या सामन्यात आज (29 ऑक्टोबर) भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे तर, दुसरीकडे इंग्लंडची आतापर्यंत काही विशेष कामगिरी राहिलेली नाही. मात्र असे असूनही कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे तीन फलंदाज सोडल्यास इतर फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लखनऊच्या एकना स्टेडियमवर भारतीय संघाने 9 विकेट गमावताना फक्त 229 धावांपर्यंत मजल मारली. (IND vs ENG Indian batsmen pile up in the face of England accurate blows 230 runs challenge)

हेही वाचा – Babar Azam : विश्वचषकातील खराब कामगिरीनंतरही बाबर आझम रोहित अन् विराटबद्दल काय म्हणाला?

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 40 धावांत भारतीय संघाने शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या रुपात आपल्या तीन विकेट गमावल्या होत्या. शुभमन गिल 9 धावा, श्रेयस अय्यर 4 धावा आणि विराट कोहलीला आपले खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही.

 

तीन विकेट पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलने चौथ्या विकेटसाठी 91 धावांची मजबूत भागीदारी केली. केएल राहुल 58 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. पण त्याचवेळी रोहित शर्माने एकदिवसीय कारकिर्दीतील 54 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 66 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. मात्र शतकापासून फक्त 13 धावा दूर असताना इंग्लंडचा फिरकी गोलंदजा आदिल रशीदने रोहित शर्माला लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद केले. रोहित शर्मा 101 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाही फक्त 8 धावा करून बाद झाला.

हेही वाचा – NED vs BAN : नेदरलँडचा आणखी एक धक्का; बांगलादेशचा 87 धावांनी पराभव

सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकारत काही चांगले फटके मारत भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. मात्र त्याचे अर्धशतक 1 धावाने हुकले. सूर्यकुमार 47 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद शमीही फक्त एक धाव काढून बाद झाला. भारताच्या 8 विकेट पडल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला, मात्र त्याने 25 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 16 धावांचे योगदान दिले. तर कुलदीप 9 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याचवेळी ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2 विकेट तर, मार्क वुडने एक विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

First Published on: October 29, 2023 6:16 PM
Exit mobile version