घरICC WC 2023NED vs BAN : नेदरलँडचा आणखी एक धक्का; बांगलादेशचा 87 धावांनी पराभव

NED vs BAN : नेदरलँडचा आणखी एक धक्का; बांगलादेशचा 87 धावांनी पराभव

Subscribe

कोलकाता : क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ म्हणून ओळखल्या जातो. अगदी तसेच सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात दिसून येत आहे. कारण, तगडे संघ म्हणून ओळख असलेल्यांवर नवखे संघ विजय मिळवत आहेत. कारण, आजच्या सामन्यात नवख्या नेदरलॅंडने अनुभवी बांगलादेश संघाला धूळ चारली असून, गुणतालिकेतही काहीसी प्रगती केली आहे. (NED vs BAN Another setback for the Netherlands Bangladesh lost by 87 runs)

विश्वचषकाच्या 28 व्या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नेदरलँडचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 42.2 षटकांत 142 धावांवर गारद झाला. याआधीच याच नेदरलॅंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मात दिली होती. तर आज बांगलादेशला नमवून त्यांनी हम भी है जोश मे हे दाखवून दिले आहे.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड संघाने बांगलादेशला 230 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले. नेदरलँडच्या संघाचा 50 षटकांत सर्वबाद 229 धावांवर खेळ आटोपला. यामध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्यांच्याशिवाय वेस्ली बॅरेसीने 41 आणि सायब्रँडने 35 धावांचे योगदान दिले. लोगान व्हॅन बीकने नाबाद 23, बास डी लीडेने 17 आणि कॉलिन अकरमनने 15 धावा केल्या. आर्यन दत्त 9, शरीझ अहमद 6 आणि विक्रमजीत सिंग 3 धावा करून बाद झाला. मॅक्स ओडाड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शकीब अल हसनलासुद्धा एक विकेट मिळाली.

हेही वाचा : NCP : शरद पवार गटातील आमदारांना विधीमंडळाची नोटीस; आठ दिवसांत बाजू मांडा

- Advertisement -

नेदरलॅंडच्या नावे विश्वविक्रम

नेदरलॅंडने बांगलादेशविरुद्धचा सामना 87 धावांनी जिंकून मोठा विक्रम केला. ICC असोसिएट सदस्याचा हा विश्वचषकातील पूर्ण सदस्यावरील सर्वात मोठा विजय आहे. नेदरलँड्सने या बाबतीत आयर्लंडचा विक्रम मोडला. 2007 च्या विश्वचषकात आयर्लंडने बांगलादेशविरुद्ध 74 धावांनी विजय मिळवला होता. 1996 मध्ये केनियाने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी तर बांगलादेशने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला होता.

हेही वाचा : NZ vs AUS : वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव!

अशी गडगडली बांगलादेशची फलंदाजी

बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने सर्वाधिक 35 धावा केल्या. महमुदुल्लाह आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. महेदी हसनने 17, तनजीद हसनने 15 आणि तस्किन अहमदने 11 धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. नझमुल हुसेन शांतो 9 धावा करून बाद झाला, शकीब अल हसन 5 धावा करून, लिटन दास 3 धावा करून आणि मुशफिकर रहीम 1 धावा करून बाद झाला. शरीफुल इस्लाम खाते न उघडता नाबाद राहिला.

नेदरलॅंडच्या गोलंदाजांची कमाल

नेदरलँड्सकडून पॉल व्हॅन मिकरेनने 4 विकेट घेतल्या. बास डी लीडेला 2 विकेट्स मिळाल्या. आर्यन दत्त, कॉलिन अकरमन आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -