जखमी बुमराह वन डे संघाबाहेर, ‘हा’ गोलंदाज घेणार त्याची जागा

जखमी बुमराह वन डे संघाबाहेर, ‘हा’ गोलंदाज घेणार त्याची जागा

शार्दूल ठाकूर (सौजन्य - न्यूज १८)

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. परंतु सीरीज सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. टी ट्वेंटी सामन्यापूर्वीच बुमराह जखमी झाला होता. त्यामुळे पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात त्याची जागा राजस्थानचा जलदगती गोलंदाज दीपक चाहरने घेतली होती. वन डे संघात त्याची जागा मुंबईचा जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने घेतली आहे. जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना जखमी झाला. त्यामुळे तो टी ट्वेंटी सामन्याला मुकला होता. तर दुसऱ्या बाजुला मुंबईकर शार्दूल ठाकूरने यंदाच्या आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. त्यामुळेच त्याला ही संधी मिळाली आहे.

डेथ ओवर्समध्ये भेदक गोलंदाजी

भारतीय संघासाठी शार्दूल ठाकूर याआधी खेळला आहे. मिळालेल्या संधीमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले होते. त्याने आतापर्यंत ३ वन डे सामन्यात २५ बळी घेतले आहेत. तसेच ७ टी-२० सामन्यात ८ बळी घेतले आहेत. त्याने या वर्षी चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. या वर्षी १३ सामन्यांमध्ये त्याने १६ बळी घेतले होते. परंतु डेथ ओवर्समध्ये घातक गोलंदाजी करून त्याने सर्वांची मने जिंकली. नवा चेंडू उत्तम प्रकारे हाताळल्यामुळे त्याने टिकाकरांची तोंडं बंद केली.

कसा असेल इंग्लंड दौरा?

भारत तब्बल अडीच महिने इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये उभय संघांमध्ये २ टी २० सामने, ३ एकदिवसीय सामने आणि ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ३ जुलै रोजी झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला होता. शुक्रवारी सायंकाळी दुसरा टी २० सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी इंग्लंडच्या नॉटिंगहॅम शहरात पहिला एकदिवसीय सामना होईल.

इंग्लंडविरूद्ध भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार , शार्दुल ठाकुर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

First Published on: July 6, 2018 5:36 PM
Exit mobile version