IND vs ENG: भारत-इंग्लंड टी-२० मालिकेला कोरोनाचा फटका; उर्वरित सामने प्रेक्षकांविना

IND vs ENG: भारत-इंग्लंड टी-२० मालिकेला कोरोनाचा फटका; उर्वरित सामने प्रेक्षकांविना

IND vs ENG: भारत-इंग्लंड टी-२० मालिकेला कोरोनाचा फटका; उर्वरित सामने प्रेक्षकांविना

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने याचा फटका भारत आणि इंग्लंड टी-२० मालिकेला बसला आहे. वाढत्या रुग्णांमुळे आता भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जातील.

वाढत्या कोरोनामुळे प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, १६, १८ आणि २० मार्चला होणाऱ्या टी-२० सामन्यांची ज्यांनी तिकीटं काढली आहेत, त्यांचे पैसे परत केले जातील, अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसीएशनचे उपाध्यक्ष धनराज नथवानी यांनी दिली. तर या तीन सामन्यांचे पासेस मिळालेल्या प्रेक्षकांना मैदानात न येण्याची विनंती केली जाणार आहे.

एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना २३ मार्च रोजी, दुसरा सामना २६ मार्च रोजी आणि तिसरा आणि अंतिम सामना २८ मार्च रोजी खेळला जाईल. हे सर्व सामने डे-नाईट असतील. वेळापत्रकानुसार एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे येथे खेळवले जाणार आहेत.

 

First Published on: March 16, 2021 10:03 AM
Exit mobile version