India vs New Zealand series : भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२ पर्यंत पुढे ढकलला

India vs New Zealand series : भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२ पर्यंत पुढे ढकलला

यंदाच्या उन्हाळ्यात असलेला भारतीय संघाचा दौरा हा आगामी वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचेच कारण ही मालिका पुढे ढकलण्यासाठी प्रामुख्याने पुढे येत आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार होते. इनसाईड स्पोर्ट्स या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंड संघाला गरजेचा असलेला अतिरिक्त वेळ हेच कारण पुढे आले आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रवक्त्याने भारतीय संघ दौरा करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हा दौरा २०२२ मध्ये करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पण क्रिकेट न्यूझीलंड किंवा बीसीसीआयकडून याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही.

आमच्या खेळाडूंना एकुणच दौऱ्यात अपेक्षित असलेला वेळ पाहता आम्ही त्यांच्या कुटूंबीयांचा विचार करूनच हा दौरा रद्द करत असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या दौऱ्यानंतर या मालिकेविषयीचा विचार करण्यात येणार असल्याचे कळते. विश्वचषकानंतर डिसेंबरच्या सुरूवातील न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतणार नाही. कारण न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे नियम कडक आहेत. त्याठिकाणी १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी आहे. दुसरीकडे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील बॉक्सिंड डे कसोटी २८ डिसेंबर किंवा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश दोन कसोटी आणि तीन टी २० मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे मालिकेवरही कोरोनाच सावट असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – ICC T20I WORLD CUP : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा


 

First Published on: September 16, 2021 6:27 PM
Exit mobile version