IND vs NZ Test series : सलामीवीर शुभमन गिलवर इरफान पठाण नाराज;म्हणाला त्याने त्याच्या…

IND vs NZ Test series : सलामीवीर शुभमन गिलवर इरफान पठाण नाराज;म्हणाला त्याने त्याच्या…

भारताने कानपूरमधील न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात १ बळी गमावूनन १४ धावा केल्या. यापूर्वी न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात २९६ धावा बनवल्या होत्या. भारतीय संघाची सलामीजोडी शुभमन गिल आणि मयंक अग्रवालकडून भारतीय संघाला चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. त्या दोघांनी किमान पहिल्या २५ षटकांची भागीदारी करायला हवी होती. मात्र असे झाले नाही, न्यूझीलंडच्या काइल जेमिसनने चमकदार गोलंदाजी करत सलामीवीर शुभमन गिलला बाद करून माघारी पाठवले. गिल या सामन्यात ज्या पध्दतीने बाद झाला आहे त्यावरून भारतीय संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठानने नाराजी व्यक्त केली आहे.

माजी क्रिकेटर इरफान पठानने गिलच्या खेळण्याच्या पध्दतीवर आणि दिवसाच्या डावाअखेर नाबाद न परतण्यावरून त्याच्यावर टिका केली आहे. त्याने सांगितले, “हे अजिबात सोपे नाही, लाइट चालू आहेत, चेंडू फिरतो आणि त्याला माहित आहे की नाबाद परत जावे लागेल. सलामीचे फलंदाज सहसा नाबाद परतण्याच्या दबावामुळे बाद होतात, परंतु शुभमन गिलला त्याच्या खेळण्याच्या पध्दतीवर नक्कीच काम करावे लागेल. त्याच्या खेळीने त्याची कमतरता निदर्शनास आणून दिली आहे”. त्याला दबावात चांगली खेळी करता येते खासकरून पहिल्या षटकांत तो प्रभावी मारा करू शकतो. जर तो त्याच्यावर काम करू शकला तर त्याच्याकडे खूप क्षमता आहे. जेमिसनच्या चेंडूवर त्याचे पाय त्याच जागी राहिले बॅट खाली येईपर्यंत खूप उशीर झाला होता. बदल्यात त्याला माघारी परतावे लागले. असे पठानने आणखी सांगितले.

कसोटीचा सलामीवीर नाही गिल – आकाश चोप्रा

दरम्यान यापूर्वी समालोचक आकाश चोप्राने सांगितले होते की, गिल माझ्यासाठी कसोटी क्रिकेटमधील सलामीवीर म्हणून योग्य खेळाडू नाही आणि त्याला मधल्या फळीत फलंदाजी करणे आवश्यक आहे. त्याने आणखी सांगितले, “जेव्हा मी त्याला खेळताना पाहतो तेव्हा तो मला कसोटी क्रिकेटचा सलामीवीर वाटत नाही. ज्या पध्दतीने तो इनसाइड खेळतो तेव्हा त्याच्या बॅटमधून बाहेरील आणि आतील दोन्ही बाजू उघड होतात ज्याचा गोलंदाजाला फायदा मिळतो. मला वाटते की त्याने मधल्या फळीत फलंदाजी करावी. त्याने सलामीवीर म्हणून चांगली फलंदाजी केली आहे. मात्र त्याची प्रमुख क्षमता पहायची असेल तर त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली पाहिजे.


हे ही वाचा: http://ICC Women’s CWC Qualifier: महिलांचा झिम्बाब्वे दौरा रद्द, वाढत्या कोरोनामुळे क्वालिफायर रद्द


 

First Published on: November 28, 2021 11:49 AM
Exit mobile version