…तर भारताला विश्वचषक जिंकणं अशक्य; पाकिस्तानच्या इंझमामने मांडले वेगळेच गणित

…तर भारताला विश्वचषक जिंकणं अशक्य; पाकिस्तानच्या इंझमामने मांडले वेगळेच गणित

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 4 विकेट ठेवून पाकिस्तानचा पराभव केला. माजी कर्णधार विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने एक अजब विधान केले. “जर टीम इंडियाला वाटत असेल तरी विराट कोहलीशिवाय वर्ल्ड कप जिंकू शकतील, तर ते कदापि शक्य नाही”, असे विधान इंझमाम उल हकने केले आहे. इंझमाम उल हकच्या या विधानानंतर क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे.

भारतीय संघाचा पाकिस्तान विरूद्धचा टी-20 विश्वचषकाच्या सलामीचा सामना अतिशय रोमांचक झाला. 160 धावांचे आव्हान भारतीय संघाने या सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली याने नाबाद 82 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर अनेकांनी देशभरात विजय साजरा केला. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतशबाजी पाहायला मिळाली.

“काही खेळाडू असे असतात जे धावा करुनही संघाला सामना जिंकवून देऊ शकत नाहीत. पण काही फलंदाज असे असतात जे कितीही दबावाची स्थिती असेल तरीही आपल्या संघाला चांगली खेळी करून सामना जिंकवून देऊ शकतात. विराट कोहली हा तसाच क्रिकेटर असून त्याच्या खेळाचा दर्जा सर्वात वरचा आहे. भारतीय संघ गेल्या काही दिवस संघर्ष करत होता. कारण विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेच विषय झाला होता. पण आता विराट कोहली आपल्या फॉर्मात परतला असल्याने विश्वचषकमधील आगामी काही सामन्यांसाठी त्याने भारताचे पारडे जड असल्याचे दाखवून दिले आहे”, असेही इंजमाम म्हणाला.


हेही वाचा – गुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

First Published on: October 25, 2022 8:05 PM
Exit mobile version