घरदेश-विदेशगुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

गुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

Subscribe

एका ठवड्याभरात गुगल कंपनीवर दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे.

यूएस कंपनी असलेल्या Google ला पुन्हा एकदा तब्बल 936 कोटी रुपये म्हणजेच 113.04 दशलक्ष डॉलर एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान या आधीही म्हणजेच मागील आठवड्यात भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला सुमारे 1,338 कोटी एवढा दंड ठोठावला होता.

त्यानंतर आज पुन्हा गुगलवर दंड ठोठावण्यात आला आहे. एका ठवड्याभरात गुगल कंपनीवर दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल डिव्हाईस स्पेसमध्ये गैरवापर केल्याचा आरोप Google वर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – फडणवीस फार कमी रागावतात, पण कधी-कधी पारा चढतो कारण…

दरम्यान या आधीही गुगलला 1,337 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने हा दंड अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइसेसच्‍या संदर्भात स्‍पर्धाविरोधी प्रथांसाठी लावला आहे. गुगलने अँड्रॉइड मोबाईल डिव्हाईस इकोसिस्टमचा गैरवापर केल्याचे भारतीय स्पर्धा आयोगाचे म्हणणे आहे. अलीकडेच एका संसदीय समितीने डिजिटल क्षेत्रातील स्पर्धाविरोधी क्रियाकलापांची चौकशी करण्यासाठी भारतातील Apple, Google, Amazon, Netflix आणि Microsoft या प्रमुख भारतीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती.

- Advertisement -

अलीकडेच विविध तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणि कंपन्यांमध्ये समन्वय नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तेव्हापासून या प्रकरणात स्पर्धेतील विविध पैलू तपासले जात होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक संसदीय स्थायी समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती टेक मार्केटमधील स्पर्धा आणि डिजिटल क्षेत्रातील स्पर्धाविरोधी क्रियाकलापांच्या विविध पैलूंची तपासणी करत होती.

हे ही वाचा – ‘राज’दरबारी महायुतीची खलबतं? श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

गुगलने कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. या संदर्भात काही उपाय खाली नमूद करण्यात आले आहेत.

– गुगल द्वारे अॅप विकसित करणाऱ्यांना, अॅपमधील खरेदीसाठी अथवा अॅप्स खरेदी करण्यासाठी कोणत्याही तृतीय पक्ष (त्रयस्थ) बिलिंग/पेमेंट प्रक्रिया सेवा वापरायची अनुमती देण्यात येईल आणि प्रतिबंध केला जाणार नाही. गुगल द्वारे त्रयस्थ बिलिंग/पेमेंट सेवा वापरणाऱ्या अशा अॅप्स बरोबर कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाणार नाही अथवा त्यांच्या विरोधात प्रतिकूल उपाययोजना केल्या जाणार नाहीत.

-गुगल, अॅप विकासकांवर कोणत्याही अँटी-स्टीयरिंग तरतुदी लादणार नाही, तसेच आपली अॅप्स आणि ऑफरचा प्रचार करण्यासाठी वापरकर्त्यांशी संवाद साधण्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिबंधित करणार नाही.

-गुगल, अंतिम वापरकर्त्यांना, अॅप विकासकांद्वारे देण्यात आलेली वैशिष्ट्ये आणि सेवा पाहण्यासाठी अॅप्समध्ये प्रवेश करण्यापासून आणि ते वापरण्यापासून, कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करणार नाही.

-गुगल, आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून मिळवण्यात आलेला डेटा, अशा डेटाचा या व्यासपीठाच्या माध्यमातून होणारा वापर तसेच अॅप विकासक अथवा इतर घटकांसह अन्य घटकांबरोबर हा डेटा शेअर करण्याबाबतचे स्पष्ट आणि पारदर्शक धोरण निश्चित करेल.

-जीपीबीएस द्वारे उत्पन्न झालेला आणि मिळवण्यात आलेला अॅप्सचा व्यवहार/ग्राहकांबाबतचा स्पर्धात्मकदृष्ट्या संबंधित डेटा, गुगल द्वारे, आपला स्पर्धात्मक फायदा पुढे नेण्यासाठी वापरला जाणार नाही. संबंधित अॅपच्या माध्यमातून मिळवण्यात आलेला डेटा, संबंधित आदेशामध्ये विशेष नमूद करण्यात आलेल्या पुरेशा सुरक्षीततेच्या उपाययोजनांसह मिळवण्यासाठी गुगल द्वारे अॅपच्या विकासकांना प्रवेश दिला जाईल.

-अॅपच्या विकासकांना पुरवण्यात आलेल्या सेवांसाठी, गुगल अॅपच्या विकासकांवर कोणतीही अयोग्य, अवास्तव, भेदभावपूर्ण अट (किमतीशी निगडीत अट) लादणार नाही.

-गुगल, अॅपच्या विकासकांबरोबर त्यांना पुरवण्यात आलेल्या सेवा आणि संबंधित शुल्काबाबतच्या संवादामध्ये संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करेल. गुगल, पेमेंट धोरण आणि शुल्क लागू करण्याबाबतचे निकष देखील निःसंदिग्धपणे प्रकाशित करेल.

-गुगल, भारतामध्ये युपीआय द्वारे पेमेंटची सुविधा देणाऱ्या अन्य अॅप्स आणि स्वतःच्या पेमेंटची सुविधा देणाऱ्या युपीआय अॅप यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -