१५ भारतीय खेळाडू ज्यांनी कसोटी पदार्पणात शतक झळकावले

१५ भारतीय खेळाडू ज्यांनी कसोटी पदार्पणात शतक झळकावले

पृथ्वी शॉचे उद्गार

मुंबईच्या पृथ्वी शॉने कसोटी पदार्पणातच शतक झळकावून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट येथील कसोटीत पृथ्वी शॉने ९९ बॉलमध्येच शतक झळकावले आणि कसोटी पदार्पणातच शतक ठोकणारा तो १५ वा खेळाडू ठरला. कमी वयात कसोटीत शतक झळकवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. तर पहिल्या स्थानावर अजूनही सचिन तेंडूलकर आहे. सचिन तेंडूलकरने वय १७ वर्ष १०७ व्या दिवशी कसोटीत सेंचूरी केली होती. पृथ्वी शॉचे आजचे वय १८ वर्ष ३२९ दिवस आहे.

हे आहेत ते पंधरा भारतीय खेळाडू

पहिल्याच कसोटीत शतक करत पृथ्वी शॉने दिग्गज क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये आपले नाव कोरले आहे. आतापर्यंत लाला अमरनाथ, दीपक शोधन, एजी क्रिपल सिंह, अब्बास अली बेग, हनुमंत सिंह, गुंडप्पा विश्वनाथ, सुरेंद्र अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण आम्रे, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी कसोटी पदार्पणात शतक झळकावलेले आहे.

तसेच पहिल्याच कसोटीत जलद शतक ठोकणाऱ्यांमध्ये पृथ्वी शॉ तिसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवनने २०१३ साली ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ८५ चेंडूवर शतक केले होते. तर ड्वेन स्मिथने २००४ साली दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ९३ चेंडूवर शतकी खेळी केली होती. पृथ्वी शॉने आज ९९ चेंडूत आपले शतक पुर्ण करुन पदार्पणात जलद शतक करण्याचाही मान मिळवला आहे. दुलिप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी शॉ हा लहान वयातील खेळाडू ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड सचिन तेडुंलकरच्या नावावर होता.

आतापर्यंत १०४ खेळाडूंनी पदर्पणात झळकवले शतक

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १०४ खेळाडूंनी कसोटी पदार्पणात शतक झळकावलेले आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजच्या लॉरेन्स रो याने १९७२ साली न्युझीलँडच्या विरोधात पहिल्याच कसोटीत दोन्ही इंनिगमध्ये शतक ठोकले होते. तर पाकिस्तानच्या यासिर हमिदने २००३ साली बांग्लादेश विरुद्ध दोन्ही इंनिगमध्ये शतक झळकावले होते. या १०४ खेळांडूपैकी सर्वाधिक १९ खेळाडू हे इग्लंडचे आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया १८, भारत १५ आणि ज्यांच्याविरुद्ध भारताची सध्या कसोटी सुरु आहे त्या वेस्ट इंडिजचे १३ तर पाकिस्तानचे अवघे ८ खेळाडू या यादीत आहेत.

First Published on: October 4, 2018 2:28 PM
Exit mobile version