भारतात रेस ट्रॅकपेक्षा शाळा, घरे बनवण्याची गरज – लुईस हॅल्मिटन

भारतात रेस ट्रॅकपेक्षा शाळा, घरे बनवण्याची गरज – लुईस हॅल्मिटन

लुईस हॅल्मिटन

भारत सर्वात गरीब देश असून या देशात स्पर्धेसाठी जाऊन चूक केल्याचे वक्तव्य फॉर्म्युला वनचा विश्वविजेता खेळाडू लुईस हॅल्मिटन याने केले होते. हॅमिल्टनने वादग्रस्त वक्तव्य करत भारतीयांचा रोष ओढावून घेतला होता. मात्र आता त्याने या विधानाचे स्पष्टीकरण देताना भारतात रेस ट्रॅकपेक्षा शाळा, घरे बनवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

रेसचे तिकीट खूप महाग होते  

स्पष्टीकरण देताना हॅमिल्टन म्हणाला की, ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी जेव्हा रेसआधी दिल्लीच्या रस्त्यांवरून जात होतो तेव्हा तिथे मला अनेक गरीब लोक, अनेक झोपड्या दिसल्या. ते पाहून मला धक्का बसला होता. इतकी बिकट परिस्थिती असताना भारतामध्ये इतका खर्च करून रेस ट्रॅक बनवण्याची गरजच काय. आता तर त्या ट्रॅकचा वापरही केला जात नाही. हा ट्रॅक बनवण्यासाठी जो पैसा वापरला गेला तोच पैसा जर शाळा आणि घरे बनवण्यासाठी वापरला गेला असता तर जास्त बरे झाले असते. आमची जेव्हा तिथे रेस झाली तेव्हा ती रेस पाहायला फारसे प्रेक्षक नव्हते. कारण या रेसचे तिकीट खूप महाग होते आणि भारतीयांना फॉर्म्युला वनमध्ये फारसा रस नाही. असे असले तरी मी खूप भारतीय चाहत्यांनाही भेटलो. त्यांना भेटून मला खूप बरे वाटले.’
First Published on: November 17, 2018 3:00 AM
Exit mobile version