कर्णधार सुनील छेत्रीनेची फुटबॉल फॅन्सना विनंती

कर्णधार सुनील छेत्रीनेची फुटबॉल फॅन्सना विनंती

भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री

भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी केवळ २५६९ लोकांनी लावली हजेरी

भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री याने टाकलेला ट्विटरवरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून यात त्याने भारतीयांना फुटबॉलला सपोर्ट करण्याचं विनंती केली आहे. १ जून रोजी मुंबईत इंटरकॉन्टिनेंटल कपमधील भारत विरुद्ध चायनीज ताईपेइ सामना झाला. ज्यात भारताने ५-० अशा मोठ्या फरकाने विजयी मिळवला. कर्णधार सुनीलने तर हॅट्रिक गोल केले. मात्र हे सर्व पाहण्यासाठी १८०००ची क्षमता असणाऱ्या मैदानात केवळ २५६९ भारतीयांनी हजेरी लावली. यामुळे नाराज सुनीलने आपल्या ट्विटरवरून भारतीयांना फुटबॉलला सपोर्ट करण्याची विनंती केली आहे.

भारतीय टीमची ३ वर्षात १७३ व्या स्थानावरून ९७व्या स्थानावर झेप

भारतीय फुटबॉल टीम ही सध्या जगात ९७व्या रँकवर आहे मागील काही वर्षात भारतीय फुटबॉल टीमने आपल्या रँकिंग मध्ये चांगला सुधार केलेला दिसून येतो. २०१५ मधील १७३ व्या रँकवरून भारतीय टीम ९७व्या रँकवर आली आहे. यात कर्णधार सुनीलची कामगिरी अप्रतिम असून इतरही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. भारताने फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये क्वालिफायर सामनेही खेळले आहेत.

२०१७ मध्ये फिफा अंडर १७ वर्ल्डकप भारतात दिमाखात संपन्न

मागील वर्षात भारतात अंडर १७ फिफा वर्ल्डकप झाला. ज्यात भारतीय अंडर १७ टीमने देखील सहभाग घेतला होता. भारतीय टीम यात जरी खास कामगिरी करू शकली नसली तरी मात्र हा कप भारतात संपन्न झाला ही भारतीयांसाठी मोठी गोष्ट होती. ६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या कपमध्ये इंग्लंडने बाजी मारली होती. जागतिक फुटबॉलकडून भारताला मिळालेल्या या सन्मानानंतर देखील भारतीय क्रीडाप्रेमींनी मात्र भारतीय फुटबॉलकडे पाठच फिरवल्याचं दिसून येत आहे.

युरोपियन क्लब संघांना मात्र भारतातून पाठिंबा

भारतातील सर्वाधिक क्रीडाप्रेमी हे क्रिकेटला सपोर्ट करत असले, तरी ४१ टक्के भारतीय हे फुटबॉलला सपोर्ट करतात. मात्र यानंतरही भारतीय फुटबॉल संघाच्या सामन्याला इतकी कमी हजेरी का? याचे कारण हे आहे की हे सर्व ४१ टक्के भारतीय युरोपियन क्लब संघांना सपोर्ट करतात. असाच सपोर्ट भारतीय संघालाही केला, तर नक्कीच भारतीय टीम ही उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास सुनीलने आपल्या व्हिडिओत व्यक्त केला आहे.

First Published on: June 4, 2018 5:36 AM
Exit mobile version