पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदक जिंकले, भारताची पदकसंख्या 56 वर

पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदक जिंकले, भारताची पदकसंख्या 56 वर

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. कॅनडाच्या मिशेल लीविरूद्ध एकतर्फी विजय मिळवत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झालं आहे. जवळपास भारताची पदकसंख्या 56च्यावर गेली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19वं सुवर्णपदक आहे. यामध्ये 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.

पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. तर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरा सेटही सिंधूने 21-13च्या फरकानं जिंकून तिने एकतर्फी विजय मिळवला आहे.

सिंधूच्या विजयाने भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. सिंगापूर आणि मलेशियन बॅडमिंटनपटूंना पराभूत करून सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिचे जिंकणे जवळपास निश्चित झाले होते. दोघींमध्ये रॅलीचा सुरेख खेळ पहायला मिळाला.

2018मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. 2018 मध्ये सिंधूला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर 2014मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.

भारतासाठी आतापर्यंत सुवर्णपदक जिंकलेल्या खेळाडूंची नावं –

सुवर्णपदक – 19 

मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू.


हेही वाचा : CWG 2022: अंतिम सामन्याआधी भारतीय हॉकी संघाला धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर


 

First Published on: August 8, 2022 3:16 PM
Exit mobile version