घरक्रीडाCWG 2022: अंतिम सामन्याआधी भारतीय हॉकी संघाला धक्का; 'हा' खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

CWG 2022: अंतिम सामन्याआधी भारतीय हॉकी संघाला धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धे 2022 स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून, भारतीय पुरुष हॉकी संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. मात्र या महत्वाच्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. हॉकी संघाचा मुख्य खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद संघाबाहेर गेला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धे 2022 स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून, भारतीय पुरुष हॉकी संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. मात्र या महत्वाच्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. हॉकी संघाचा मुख्य खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद संघाबाहेर गेला आहे. दुखापतीमुळे विवेक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सुवर्णपदकासाठीच्या अंतिम सामन्यात खेळणार नाही. (Commonwealth Games 2022 Vivek Sagar Prasad out of mens hockey final due to injury)

दुखापतीमुळे विवेक सागर प्रसाद याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता विवेकची संघातील जागा कोण भरून काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय हॉकी संघाला यंदा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. कारण भारतीय हॉकी संघ याआधी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कधीच सुवर्णपदक जिंकू शकलेला नाही. आतापर्यंत हॉकी संघाला फक्त दोन रौप्यपदक मिळवता आली आहेत.

भारतीय पुरुष हॉकी संघ 2010 आणि 2014 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचला होता. मात्र दोन्हीवेळा पराभूत झाला. विशेष म्हणजे दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता. शिवाय, यंदाही भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. त्यामुळे यंदा भारतीय संघाकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया एक बलाढ्य संघ आहे. त्यांनी आतापर्यंत सहा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 1998 साली हॉकीचा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला. प्रत्येकवेळी चॅम्पिशिपचा किताब ऑस्ट्रेलियानेच जिंकला.


हेही वाचा – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अखेरचा दिवस; भारताला किती ‘सुवर्ण’ मिळू शकतात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -