झिम्बाब्वे दौऱ्याला गंभीरपणे न घेणे भारतासाठी ठरू शकते मोठी चूक

झिम्बाब्वे दौऱ्याला गंभीरपणे न घेणे भारतासाठी ठरू शकते मोठी चूक

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बॉव्वे दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 18 ऑगस्टपासून भारत आणि झिम्बॉव्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वजन आहे. भारताचे खेळाडूही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे झिम्बॉव्वे संघाकडे भारतीय संघ गंभीरपणे लक्ष देत नाही. तसेच, झिम्बॉव्वे दौऱ्याला हलक्यात घेत असल्याचे दिसते. मात्र झिम्बॉव्वेच्या संघाला हलक्यात घेणे भारतीय संघाला महागात पडू शकते. (India Tour Of Zimbabwe dont take us lightly Zimbabwe warned India before the tour)

झिम्बाब्वे संघाने नुकताच झालेल्या 3 मोठ्या मालिकेत विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी प्रथमच सलग 3 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. या विजयासह झिम्बॉव्वेच्या संघाने इतिहास घडवला आहे. तसेच, झिम्बाब्वे संघ टी-20 वर्ल्डकप क्वालिफायल मालिका जिंकली आहे. याशिवाय, झिम्बॉव्वेने बांगलादेशविरुद्धची टी-20 आणि वनडे मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे झिम्बॉव्वे संघाचा संध्याची खेळी लक्षात घेता भारताने झिम्बॉव्वे दौरा गंभीरपणे न घेतल्यास ही मोठी चूक ठरणार आहे.

झिम्बाब्वे संघाने तिनही मालिकेत मिळवलेल्या विजयात अष्टपैलू सिकंदर रजा याने आक्रमक खेळी केली होती. सिकंदर रजाच्या खेळीची क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. त्यामुळे क्वालिफायर फायनलमध्ये 8 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही मालिकेत त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. टी-20 मालिकेत 2 विकेट आणि 127 धावा तर वनडेत त्याने 5 विकेट आणि 252 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेने क्वालिफायलमध्ये नेदरर्लंडचा 37 धावांनी पराभव केला. बांगलादेशविरुद्धची टी-20 आणि वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

भारत- झिम्बॉव्वे वनडे वेळापत्रक

           सामना                   कधी                ठिकाण

तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारताने झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी 2016 मध्ये भारताने झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळली होती.


हेही वाचा – ‘या’ खेळाडूला दुखापत; झिम्बॉव्वे दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का

First Published on: August 12, 2022 11:22 AM
Exit mobile version