विराटची एकाकी झुंज व्यर्थ; पहिल्या कसोटीत इग्लंडचा २२७ धावांनी विजय

विराटची एकाकी झुंज व्यर्थ; पहिल्या कसोटीत इग्लंडचा २२७ धावांनी विजय

विराटची एकाकी झुंज व्यर्थ; पहिल्या कसोटीत इग्लंडचा २२७ धावांनी विजय

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इग्लंडने भारताला २२७ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसापासून इग्लंडची सामन्यावर पकड होती. पहिल्या तीन दिवस फलंदाजीसाठी अनुकूल असलेली चेन्नईची खेळपट्टीवर शेवटच्या २ दिवस गोलंदाजांनी गाजवले. इंग्लंडने भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देत सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. इग्लंडकडून दुसऱ्या डावात जेम्स अँडरसने ३ तर जॅक लीचने ४ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कर्णधार विराट कोहलीने ७२ एकाकी झुंज देत ७२ रनची खेळी केली. तर शुभमन गिल ५० धावा करुन परतला. तर संघातील सर्वोक्तृष्ट खेळाडू अजिंक्य राहणे, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे तिघांनाही आपले खातं खोलता आले नाही. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, डॉमनिक बेस आणि बेन स्टोक्सने १-१ असे गडी बाद केले आहेत. शुभमन गिल नंतर राहणेही बाद झाला.

राहणे नंतर आलेल्या ऋषभ पंतकडून संघाला मोठी आपेक्षा होती परंतु त्यालाही एडरसनने बाद करुन माघारी पाठवले. भारताची बिकट अवस्था झाली होती. भारताचे ११० वर निम्मे खेळाडू बाद झाले होते. सुंदर शुन्यावर बाद झाल्यानंतर भारत ६ बाद ११७ धावांवर होता. यावेळी विराट कोहली आणि अश्विन मैदानावर होते. परंतु १७१ धावांवर अश्वीनही बाद झाला. लीचने अश्विनला बाद करुन माघारी पाठवले. अश्विननंतर विराटने चांगली खेळी करत आपले २४ वे अर्धशतक ठोकले. परंतु अर्धशतक नंतर विराटला स्टोक्सने ७२ धावांवर बाद केले. विराटला बाद केल्यानंतर इग्लंडचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. नदीम आणि जोफ्रा आर्चरने बुमराहला बाद केल्यावर इग्लंडने विजयाव मिळवला आहे.

First Published on: February 9, 2021 2:05 PM
Exit mobile version