IND vs ENG : ईशांत आऊट, अश्विन इन? चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदलाची शक्यता

IND vs ENG : ईशांत आऊट, अश्विन इन? चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदलाची शक्यता

चौथ्या कसोटीसाठी ईशांत शर्मा भारतीय संघातून आऊट?

पहिल्या दोन सामन्यांतील चांगल्या कामगिरीनंतर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. हेडिंग्ले येथे झालेला तिसरा कसोटी सामना भारताने डावाच्या फरकाने गमावला. या सामन्यात भारताचे दोन डाव ७८ आणि २७८ धावांवर आटोपले. तर गोलंदाजांनाही फारशी छाप पाडता आली नाही. इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावांची मजल मारत त्रिशतकी आघाडी घेतली होती. भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला २२ षटकांत एकही विकेट घेता आली नाही आणि त्याने ९२ धावा खर्ची केल्या. त्यामुळे ओव्हल येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी त्याला वगळून भारतीय संघ अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संधी देण्याची दाट शक्यता आहे.

विकेट नाही आणि धावाही खर्ची केल्या

ईशांत हा सातत्याने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याला विकेट घेता येत नसल्या तरी तो धावा देत नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीत त्याला विकेटही घेता आली नाही आणि त्याने धावाही खर्ची केल्या. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याला संघाबाहेर बसावे लागू शकेल. त्याच्या जागी अश्विन या मालिकेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकेल. ओव्हलच्या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळते. परंतु, भारतीय संघ अश्विन आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता कमी आहे.

शार्दूल, उमेशपैकी एकाची निवड? 

तिसऱ्या कसोटीनंतर जाडेजाच्या गुडघ्याचे स्कॅन काढण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहेत. जाडेजा आणि ईशांतला वगळण्यात आल्यास अश्विससह शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांपैकी एकाची संघात निवड होऊ शकेल. तसेच मोहम्मद शमीला विश्रांती देण्याबाबतही चर्चा होत आहे.


हेही वाचा – कोहलीचा अतिरिक्त फलंदाज खेळवण्यास नकार


 

First Published on: August 30, 2021 10:45 PM
Exit mobile version