IND vs ENG : अखेरच्या सामन्यात भारतीय संघात ‘हा’ मोठा बदल

IND vs ENG : अखेरच्या सामन्यात भारतीय संघात ‘हा’ मोठा बदल

कसोटी आणि टी-२० सामन्यांनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. इंग्लंडच्या मॅंचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Emirates Old Trafford) येथे तिसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताने संघात बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामना इंग्लंडने जिंकला. त्यामुळे या अखेरच्या सामन्यात कोणता संघ जिकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर अखेरचा वनडे सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. विविध भाषेतून सामन्याचा आनंद घेता येईल.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा संघ :

जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकिपर), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली, क्रेग ओव्हरटन.


हेही वाचा – गौरवास्पद : सिंगापूर ओपनचे जेतेपद मिळवत पी. व्ही. सिंधूने घडवला इतिहास

First Published on: July 17, 2022 4:03 PM
Exit mobile version