आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी

आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) नुकताच टी-20 क्रमावारीका जाहीर केली आहे. आयसीसीसच्या क्रमवारीनुसार, भारताचा युवा फंलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आला आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तरबेज शम्सी गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला आहे.

वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवनं 44 चेंडूत 76 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 च्या क्रमावारीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर आहे. सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी-20 मालिकेत सुर्यकुमार यादवने आतापर्यंत तीन सामन्यात 168 स्ट्राईक रेटने 111 धावा केल्या आहेत.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने गतवर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने चांगली खेळी केली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते.


हेही वाचा – आशिया कप २०२२ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; नव्या खेळाडूंना संधी

First Published on: August 3, 2022 5:33 PM
Exit mobile version