भारतीय क्रिकेट फॅन्सचं ‘हे’ गाणं कांगारूंना झोंबलं हो!

भारतीय क्रिकेट फॅन्सचं ‘हे’ गाणं कांगारूंना झोंबलं हो!

सिडने टेस्ट मॅचमध्ये भारतीय प्रेक्षकांचं गाणं

क्रिकेटच्या मैदानावर चाहते आपल्या टीमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत असतात. कुणी आपल्या खेळाडूच्या नावाचे बोर्ड झळकावत असतं, तर कुणी लाइटचे किंवा विविध रंगांचे फुगे उडवत असतं. मॅचच्या वेळी तर स्टेडियम अशा गोष्टींना भरलेलं असतं. पण भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियातल्या भारतीय चाहत्यांनी तर चिअर करण्याचा अजबच प्रकार शोधून काढला. सिडनी ग्राऊंडवर सुरु असलेल्या या मॅचच्या चौथ्या दिवशी या बहाद्दरांनी थेट भारतीय बॅट्समन रिषभ पंत याच्यावरच गाणं रचलं. आणि या गाण्याचे शब्दच असे काही होते, की ते ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना चांगलेच झोंबले असतील!

दुसरा दिवस रिषभ पंतचा!

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथे सध्या चौथी टेस्ट मॅच सुरू असून त्यात शुक्रवारी मॅचच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केला तेव्हा भारताच्या खात्यावर ७ विकेट्सच्या मोबदल्यात ६२२ रन्सचा डोंगर आहे. त्याच्या उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या ओपनर्सने कोणतीही विकेट न गमावता १० रन्स करून दिवस अखेरपर्यंत खिंड लढवली आहे. मात्र यावेळी दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर चर्चा राहिली ती भारतीय बॅट्समन रिषभ पंत याची. कारण भारताचा डाव घोषित होईपर्यंत रिषभ पंत १५९ रन्स करून नॉट आऊट राहिला होता.

…आमच्याकडे रिषभ पंत आहे!

रिषभ पंतने केलेल्या या धमाकेदार बॅटिंगनंतर भारतीय प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना एक खुमासदार गाण ऐकवून चांगलंच बेजार केलं. स्टेडियममध्ये बसलेल्या या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रेक्षकांना टोचेल असे या गाण्याचे शब्द ठेवले होते.

‘He’ll hit you for a six
He’ll babysit your kids
We’ve got Rishab Pant’

(तो तुम्हाला सिक्स मारेल
तो तुमच्या मुलांनाही सांभाळेल
आमच्याकडे आहे असा रिषभ पंत)

असे या गाण्याचे शब्द होते. हे गाणं म्हणत असताना भारतीय प्रेक्षकांमध्ये उत्साह आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांमध्ये संताप दिसत होता. वास्तविक या सगळ्या प्रकाराल रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टन पेन यांच्यामध्ये झालेल्या स्लेजिंगची पार्श्वभूमी होती.

रिषभ-पेनमध्ये झालं होतं स्लेजिंग

‘महेंद्रसिंग धोनी टी-२० टीममध्ये परत आला आहे. त्यामुळे तुला आता काही काम नसेल. तर माझ्या घरी माझ्या मुलांचा सांभाळ करायला ये. मी माझ्या बायकोला घेऊन सिनेमा पाहायला जाईन, अशा प्रकारची टिप्पणी पेनने रिषभबद्दल केली होती. त्यावर रिषभने देखील लगेच प्रत्युत्तर देऊन ‘बघा रे आपल्याकडे सध्या ‘तात्पुरता कॅप्टन’ आला आहे खेळायला. हा नाही टिकणार जास्त वेळ’, असं म्हटलं होतं. मात्र, आता त्याला भारतीय प्रेक्षकांनी तयार केलेल्या या गाण्याचा तडका मिळाला आहे. थोडक्यात काय, तर रिषभ पंतने मैदानावर झुंजार खेळी करून कांगारूंना जेरीस आणले, तर दुसऱ्या बाजूला भारतीय प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना सुनावलं!


हेही वाचा – स्मृती मंधाना Cricketer of the Year !!
First Published on: January 4, 2019 9:26 PM
Exit mobile version