मनप्रीत, श्रीजेशला विश्रांती; हरमनप्रीत कर्णधार

मनप्रीत, श्रीजेशला विश्रांती; हरमनप्रीत कर्णधार

हॉकी

टोकियोमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची गुरुवारी घोषणा झाली. या स्पर्धेसाठी कर्णधार मनप्रीत सिंग आणि गोलरक्षक श्रीजेश यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणार्‍या या स्पर्धेसाठी १८ खेळाडूंच्या चमूत मनप्रीत आणि श्रीजेशसोबतच बचावपटू सुरेंदर कुमारचाही समावेश नव्हता. या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे, तर उपकर्णधार मनदीप सिंगची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.

नवोदित आशिष टोपनो आणि शमशेर सिंग या खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली असून ते आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. तसेच गुढघ्याला झालेल्या दुखापतीतून सावरलेला अनुभवी आघाडीच्या फळीतील खेळाडू एसव्ही सुनीलचे संघात पुनरागमन झाले आहे. ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंग, बिरेंद्र लाक्रा आणि आकाशदीप सिंग यांना मात्र संघात स्थान मिळालेले नाही. श्रीजेश संघात नसल्यामुळे क्रिशन बहादूर पाठक आणि युवा सुरज करकेरा यांच्यावर गोलरक्षक म्हणून जबाबदारी असणार आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑलिम्पिकची पात्रता फेरी होणार असल्यामुळे अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी सांगितले.

भारतीय संघ –

क्रिशन बहादूर पाठक, सुरज करकेरा, गुरिंदर सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), कोठाजीत सिंग खाडंगबम, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद, जस्करण सिंग, मनदीप सिंग, गुरसाहेबजीत सिंग, नीलम संजीप, जरमनप्रीत सिंग, वरून कुमार, आशिष टोपनो, शमशेर सिंग, सुनील, गुर्जन्त सिंग.

First Published on: July 26, 2019 4:27 AM
Exit mobile version