भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव, रौप्य पदकावर मानावे लागले समाधान

भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव, रौप्य पदकावर मानावे लागले समाधान

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे.  भारताचा ऑस्ट्रेलियाने 7-0 ने पराभव केला. यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

आंतीम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघ हे संघ आमने-सामने होते. या महत्त्वाच्या सामन्यात भारत सुरुवातीपासून पिछाडीवर होता.ऑस्ट्रेलिया पहिल्या क्वॉर्टरपासून गोलवर गोल करत होती. संपूर्ण सामन्यात एकही गोल भारताला करता आला नसल्याने अखेर भारत 7-0 ने पराभूत झाला.

आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलियाने खेळले 129 सामने  –

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात भारत कायमच पिछाडीवर राहिला आहे. भारताला गेल्या वर्षी टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून 1 -7 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकता भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलियासमोर मात खाताना दिसला आहे. दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 129 सामने खेळण्यात आले आहेत. यातील 86 सामन्यात ऑस्टेलियाने विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त 23 सामन्यात यश मिळाले आहे. 20 सामने अनिर्णयीत राहीले आहेत.

कॉमनवेल्थमध्ये भारतीय हॉकी संघाची कामगीरी – 

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय हॉकी संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. भारताने आपल्या चार पैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक दिली होती. भारतानं वेल्स, कॅनडा आणि घानाविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला होता. तर, इंग्लंडविरुद्ध सामना अनिर्णीत ठरला आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3-2 असा पराभव करत भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. अखेर फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.

कॉमनवेल्थ हॉकी स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व –

1988 मध्ये पहिल्यांदाच हॉकी खेळाचा कॉमनवेल्थ स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत कॉमनवेल्थ स्पर्धेत हॉकीच्या सहा स्पर्धा पार पडल्या आहेत. या सर्व स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले आहे. 2010 आणि 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली होती. मात्र, शेवटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

First Published on: August 8, 2022 7:30 PM
Exit mobile version