भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, विरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत नाही- इमरान खान

भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, विरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत नाही- इमरान खान

भारताने IT क्षेत्रात विकास केला पण आपलं दुर्दैव... इम्रान खान सरकारने केली भारताशी तुलना

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran khan) यांनी भारताविषयी एक महत्त्वाचे निधान केले आहे ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे जागतिक क्रिकेटवर भारताचा चांगलाच कंट्रोल आहे,असे वक्तव्य इमरान खान यांनी केले आहे. पुढे त्यांनी म्हटले की, इंग्लंडने याआधी दोन वेळा आमच्यासोबतचे दौरे रद्द केले, मात्र भारतासोबत असे करण्याची त्यांची हिंमत नाही. पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयने जर आयसीसीला फंडिंग देणे थांबवले तर पकिस्तान उद्धवस्त होईल असे म्हटले होते.

पुढे इमरान खान यांनी म्हटले की, आता केवळ पैसा महत्त्वाचा आहे. भारत सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे असे असताना कोणताही देश त्याच्या विरोधात एकही पाऊल उचलण्याची हिंमत करणार नाही. इंग्लंडने जे पाकिस्तानसोबत केले तसे ते भारतासोबत कधीच करणार नाहीत. केवळ खेळाडूंचेच नाही तर विविध देशातील बोर्डांकडून भारताला पैसे मिळतात म्हणून भारताचा क्रिकेटवर कंट्रोल आहे.

पाकिस्तानसारख्या देशासोबत खेळून आपण त्यांच्यावर उपकार करत आहोत असे इंग्लंडला वाटत असेल आणि याचे कारण केवळ पैसा हेच आहे,असे देखील इमरान खान यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, मी पाकिस्तान आणि इंग्लंडचे संबंध वाढताना पाहिले आहेत. मात्र इथे त्यांनी स्वत:ला कमी दाखवून दिले आहे.

टी२० वर्ल्ड कपच्या आधी इंग्लिश पुरुष टीमला दोन टी २० वर्ल्ड कप खेळायचे होते. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या महिला संघाला देखील पकिस्तानच्या दौऱ्यावर यायचे होते मात्र सुरक्षेचे कारण देऊन ईसीबीने दौरा रद्द केला होता. परंतु त्यावेळी न्यूझीलँडची टीम पाकिस्तानमध्ये पोहचली होती. टीमने मॅच सुरू केली मात्र अर्धा तासाच मॅच रद्द करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानच्या टी २० वर्ल्ड कपच्या तयारीला मोठा फटका बसला होता,असे इमरान खान यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान

First Published on: October 12, 2021 9:33 AM
Exit mobile version