भारताचा महिला फुटबॉल संघ पुरुष संघापेक्षा सरस

भारताचा महिला फुटबॉल संघ पुरुष संघापेक्षा सरस

सुनील छेत्री

भारताच्या महिला संघाने काही दिवसांपूर्वीच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते. हे त्यांचे सलग पाचवे जेतेपद होते. तसेच हा संघ जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानी आहे, तर भारताचा पुरुष फुटबॉल संघ क्रमवारीत १०३ व्या स्थानी आहे. त्यामुळे सध्यातरी पुरुष संघापेक्षा भारतीय महिला फुटबॉल संघ सरस आहे, असे पुरुष संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला.

मला महिला संघाचा खूप अभिमान आहे. मी नेहमीच म्हणत आलो आहे की भारताचा महिला संघ हा पुरुष संघापेक्षा कितीतरी चांगला आहे. आता म्यानमारमध्ये जाऊन तिथल्या स्पर्धेतही तुम्ही चांगली कामगिरी कराल असा मला विश्वास आहे. मी तुमच्या खेळावर नजर ठेवून आहे. तुम्ही यापुढेही आपली चांगली कामगिरी सुरू ठेवा, असे सॅफ स्पर्धा जिंकल्याबद्दल महिला संघाचे अभिनंदन करताना छेत्री म्हणाला.

आता भारतीय महिला फुटबॉल संघ ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत भाग घेणार आहे. म्यानमार येथे ३ एप्रिलपासून सरू होणार्‍या या स्पर्धेत भारत, म्यानमार, नेपाळ आणि इंडोनेशिया हे संघ एका गटात आहेत.

First Published on: March 26, 2019 4:04 AM
Exit mobile version