IPL 2019:MI vs CSK सामन्याच्या विनोदी मीम्सचा सोशल मीडियावर वर्षाव

IPL 2019:MI vs CSK सामन्याच्या विनोदी मीम्सचा सोशल मीडियावर वर्षाव

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचील इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०१९ च्या अंतिम लढतीच्या सामन्यात असंख्य मुंबईकरांच्या अपेक्षा पुर्ण झाल्यात. हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा रोमांचकारी सामना मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रंगला.

विशिष्ट गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले. मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले. मुंबईने अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर आपले नाव कोरले.

या विक्रमी विजयाचे सेलिब्रेशन करताना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून MI vs CSK याचे विनोदी मीम्सचा सोशल मीडियावर वर्षाव होताना दिसत आहे.

या रोमांचकारी सामन्याचे विनोदी मीम्स –

First Published on: May 13, 2019 8:43 AM
Exit mobile version