स्मिथ सेना राजधानी दिल्लीला नमवेल का?

स्मिथ सेना राजधानी दिल्लीला नमवेल का?

स्मिथ सेना राजधानी दिल्लीला नमवेल का?

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणेला नेतृत्वात आलेल्या अपयशामुळे त्याला राजस्थान संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता ही जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे. अर्थात स्मिथने या संधीचं सोनं करत स्वत:च्या नेतृत्व कौशल्याला सिद्ध केलं. शनिवारी मुंबई विरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानच्या स्मिथ सेनाने मुंबईला धूळ चारली. त्यामुळे आजच्या सामन्यातही राजस्थानचा संघ स्मिथच्या नेतृत्त्वाखाली चांगलं प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. दिल्लीच्या घरच्या अर्थात फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्ली आणि राजस्थान यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना आज रात्री आठ वाजता सुरु होणार असून आयपीएलच्या १२ व्या मोसमातील हा ४० वा सामना असणार आहे.

गुणतालिकेत अवघ्या तिसऱ्या स्थानावर आल्यामुळे दिल्लीचा आत्मविश्वास बळावला आहे. या मोसमात आतापर्यंत फारशी मोठी कामगिरी न करु शकलेल्या राजस्थानच्या संघाला आपण मैदानावर सहज आडवं पाडू, असा विचार जर दिल्ली करत असेल तर दिल्लीसाठी हा विचार म्हणजे धोक्याचा घंटा ठरू शकतो. कारण राजस्थान जवळील जोफ्रा आर्चर सारखा वेगवान गोलंदाज आणि श्रेयस गोपाळ सारखा लेगस्पिनर अजूनही शाश्वत खेळीचे प्रदर्शन दाखवत आहेत.

दुसरीकडे दिल्लीजवळ शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शाॅ, ॠषभपंत सारख्या चांगल्या फलंदाजांची मांदियाळी आहे. कॅगिसो रबाडा सारखा चपराक गोलंदाज आहे. याशिवाय ईशांत शर्मा, अमित मिश्रा आपली चोख भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांच्या माऱ्याला तडीस तोड उत्तर देत राजस्थान विजयावर आपला झेंडा फडकवेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ‌.

First Published on: April 22, 2019 9:51 AM
Exit mobile version