RR vs MI : स्टीव्ह स्मिथने कर्णधार झाल्यानंतर केली विजयाची बोहनी

RR vs MI : स्टीव्ह स्मिथने कर्णधार झाल्यानंतर केली विजयाची बोहनी

स्मिथ

स्टीव्ह स्मिथने कर्णधार पदाची धूरा सांभाळल्या नंतर पहिल्याच सामन्यात विजयाची बोहनी केली. राजस्थानने ५ गडी राखत मुंबईचा पराभव केला आहे. राजस्थानच्या या विजयात स्मिथचा महत्त्वाचा वाटा ठरला. त्याने नाबाद ४८ चेंडत ५९ धावा केल्या. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्लेऑफसाठी चढाओढ सुरु झाली आहे. सध्या मुंबई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानला या हंगामात फारशी विशेष कामगिरी करता आलेली नाही. आठ सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांमध्ये राजस्थानचा विजय मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला. अजिंक्य रहाणेला कर्णधार पदावरुन पायउतार करुन स्टीव्ह स्मिथकडे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, शनिवारी मुंबई आणि राजस्थान यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानावर अर्थात सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा हाच निर्णय योग्य ठरुन मुंबईला धूळ चारण्यात राजस्थानला यश आले.

मुंबईने दिलेल्या १६२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणे स्वस्तात तंबूत परतला. त्याने १२ चेंडूत १२ धावा केल्या. यामध्ये त्याने दोन चौकार लगावले. त्यानंतर संजू सॅमसनही उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. राहुल चहरच्या चेंडूवर उंच फटका मारत असताना कायरण पोलार्डने झेलबाद केले. संजूने आक्रमक खेळी खेळत १९ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. परंतु, स्टीव स्मीथ आणि रियाग पराग यांनी डाव सावरत मुंबईच्या गोलंदाजांपुढे टिच्चून मारा केल्या. रियाग परागने आक्रमक खेळी खेळत २९ चेंडूत ४३ धावा केल्या. परंतु, अधिक धावा करण्याच्या नादात तो धावबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला अशतोष टर्नरही पहिल्याच चेंडूत बाद झाला.

मुंबईची सुरुवात हवी तशी झाली नाही. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फक्त ५ धावा करुन स्वस्तात परतला. तो उंच फटका खेळण्यासाठी पुढे आला आणि त्याला चेंडू समलाच नाही. त्याने गोलंदाजाच्या हातात झेल दिला आणि रोहित बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादवही ३३ चेंडूत ३४ धावा करुन माघारी परतला. मात्र तरिही सलामीवर क्विंटन डी कॉक आक्रमकपणे खेळत राहिला. त्याने दमदार षटके आणि चौकार लागवत ३४ चेंडूत अर्धशतक पटकावले. परंतु, ६५ धावा करुन तो देखील बाद झाला. त्यानंतर मुंबईचा आक्रमक फलंदाज कायरण पोलार्ड मैदानात उतरला. त्याच्याकडे चाहत्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, तो देखील आज फार काही मोठी कामगिरी करु शकला नाही. १ षटकार मारुन तो बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या आला. १५ चेंडूत २३ धावा करुन तो तंबूत परतला. शेवटच्या क्षणाला बेन कटिंगने १ चौकार आणि १ षटकार मारुन मुंबईला १६१ धावांपर्यंत पोहोचवले. मुंबईने २० षटकांत ५ बाद १६१ धावा अशी खेळी केली.

First Published on: April 20, 2019 7:43 PM
Exit mobile version