IPL 2020: मुंबई इंडियन्सला धक्का; हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमधून बाहेर?

IPL 2020: मुंबई इंडियन्सला धक्का; हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमधून बाहेर?

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यानंतर CSK आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ रोहितविना मैदानात उतरला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात प्रेझंटेशन सेरेमनीला पोलार्डने रोहितला गंभीर दुखापत नसून लवकरच मैदानावर दिसेल असं सांगितलं. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार रोहित शर्माची दुखापत गंभीर असून आगामी सामन्यांमध्ये रोहित शर्माला खेळता येणार नाही.

रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील सामने खेळू शकेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, क्विंटन डिकॉकने रोहितच्या दुखापतीविषयी बोलताना रोहित खुप लवकर बरा होत आहे. परंतु, कोणत्या सामन्यात पुनरागमन करेल हे सांगता येत नाही आहे, असं देखील डिकॉक म्हणाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा; रोहित शर्मा संघाबाहेर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय सामने, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही, पण IPLमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.


हेही वाचा – IND vs AUS : वरुण चक्रवर्ती भारताच्या टी-२० संघात; रोहित, ईशांतबाबत प्रश्नचिन्ह  


 

First Published on: October 26, 2020 10:03 PM
Exit mobile version