IPL 2020 : प्ले-ऑफची टक्कर आजपासून; क्वालिफायर-१ मध्ये मुंबई-दिल्ली आमनेसामने

IPL 2020 : प्ले-ऑफची टक्कर आजपासून; क्वालिफायर-१ मध्ये मुंबई-दिल्ली आमनेसामने

श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा 

युएईमध्ये होणारी यंदाची आयपीएल स्पर्धा आता अखेरच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. गुरुवारपासून (आज) प्ले-ऑफला प्रारंभ होणार असून क्वालिफायर-१ च्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. गतविजेत्या आणि विक्रमी चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यास उत्सुक आहे.

First Published on: November 5, 2020 1:00 AM
Exit mobile version